मुख्यमंत्र्याची आश्वासनाची खैरात ठरली वांझोटी ; शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्येला शासन धोरण जबाबदार -शेतकरी नेते मनीष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना!

पुसद : महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून अतिवृष्टी ग्रस्त बाधितांना दिवाळी पूर्व शासन धोरणानुसार राज्य शासनाने घोषित केलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी पूर्व जमा , न झाल्याने आर्थिक विवेचनेत उध्वस्त झालेल्या व हताश शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून तीव्र नाराजी व्यक्त करत गाव गाड्यात याचे पडसाद उमटले आहे.
आज शासन धोरणाचा निषेध करून काळी दिवाळी साजरी करण्यात आली अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात हाहाकार माजला जवळपास चार लाख हेक्टर वर अतिवृष्टीने शेती आणि शेतमालाच सह जीवित हानी पशुहानी अतोनात नुकसान झालं राज्य शासनाकडून मदतीच्या नावावर मोठ पॅकेज घोषित झालं दिवाळी पूर्व ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असा आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले होते पण दुर्दैवाने हे त्यांच हे आश्वासन वांझोटे ठरलं अतिवृष्टीने आर्थिक दृष्ट्या हताश असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी झाली शेतकऱ्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना मात्र असंवेदनशील शासन शेतकऱ्यांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत आहे मागील नऊ महिन्यात २७४ दिवसात २९९ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेले आहे सर्व शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून टाकले काळ्या पट्ट्या बांधून काळे झेंडे मुख्यमंत्र्याच्या नावाने दाखवून महायुती शासनाचा शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात आला.
महायुती शासनाने निवडणुकीच्या काळात दिल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा व जाहीर झालेली मदत शासन धोरणा नुसार निकषावर बोट न ठेवता तात्काळ वर्ग करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली हे आंदोलन शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वात झाले यावेळी रमेश जाधव अशोक पवार अशोक जाधव मनोहर चव्हाण संजय जाधव हिरा पवार सुनील राठोड रवी राठोड मदन राठोड तुकाराम राठोड यांच्यासह गावातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.




