ईतर

पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुसदच्या दुटप्पी धोरणामुळे शहराचे अर्थकारण काही अंशी ठप्प!

योगा भवन बनले काही व्यापाऱ्यांच्या राजकारणाचा अड्डा!

पुसद: शहरातील पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुसदच्या दुटप्पी धोरणामुळे शहराच्या विकासाला संपूर्णपणे खिळबसली आहे. ही संघटना शहरांत एका राजकीय पक्षांकडून फायदा घेऊन दुसऱ्या राजकीय पक्षांचा प्रचार कराया योगाभवन मध्ये काही व्यापाऱ्यांनी कार्यालय उघडलं काय असा प्रश्न चर्चीला जात आहे.पुसद शहरात व्यापार्‍यांची वाढती संख्या बघता व्यापारी संघटनांनी माजी मंत्री मनोहररावजी नाईक यांच्याकडे वारंवार व्यापारी भवनाची मागणी रेटली होती. त्यामागणीला प्रतिसाद देत मनोहरराव नाईक यांनी २०१८ साली पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शरदभाऊ मैंद यांच्या माध्यमातून माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी शब्द दिला होता त्यामुळे योगाभवनाची जागा योगा भवनला न देता त्या जागेवर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून योगा भवनाच्या नावावर निधी देऊन सुसज्ज बांधकाम करण्यात आले व त्या योगा भवनास नियम बाह्य पद्धतीने व्यापाऱ्यांसाठी व्यापारी भवन म्हणून योग संघटनेचा विरोध असतांनाही राजकीय हेतू परस्पर हे योगाभवन व्यापारी भवन म्हणून पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुसद या संघटनेला सुपूर्द करण्यात आले. परंतु ही पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, संघटना या योगाभोवनाचा वापर दुसऱ्या विरोधी पक्षाचे कार्यालय म्हणूनच करीत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ज्या पक्षाने या भावनासाठी जागा देऊन बांधकाम करून दिले त्याच पक्षाच्या विरोधात या भावनाचा वापर केला जात आहे.पुसद शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील दुसऱ्या नंबरची बाजारपेठ आहे या शहरातील अर्थव्यवस्था ही परिसरातील खेडेगावातील ग्रामस्थ आणि शहरातील नागरिकांवर अवलंबून होती. येथे दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शहरातील नागरिकांसह परिसरातील माणसे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेची उलाढाल होत होती.येथील छोट्या मोठ्या व्यावसायिक, विक्रेते यांचा या बाजारपेठेवर अर्थकारण चालायचे. मात्र सध्या बाजारात माणसांची वर्दळ कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम येथील अर्थव्यवस्थेवर झाला. याचे कारण म्हणजे पुसद शहरात ३ एप्रिल २००९ मध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली होती. त्यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हिंसक दंगल झाली. या दंगलीत ७० हून अधिक व्यापारीचे दुकाने जाळली गेली आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते या दंगलीची राज्यभर चर्चा झाली होती. या दंगलीनंतर पुसदमध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त काळ संचारबंदी लावण्यात आली होती.पुसदमधील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी फार मोठा अवधी लागला होता. अनेक गोरगरिबाच्या लेकरावर गुन्हे दाखल झाले होते त्यांची परिस्थिती नसता सुध्दा  त्यांना न्यायालयात मोठमोठे वकील उभे करावे लागले त्या घटनेचा आजही त्यांच्या कुटुंबांना नाहक त्रास होत आहे. ज्या  व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यांना या संघटनेने कोणत्याही प्रकारे मदत केली नाही उलट ही संघटना व्यापाऱ्याकडून देणगी घेऊन चालवल्या जाते अशी चर्चा परंतु या संघटनेमध्ये जोडलेले आजही १)औषधी विक्रेता संघ,२ )हार्डवेअर व इलेक्ट्रीकल्स संघटना,३) कृषी साहित्य विक्रेता संघ,४) सराफा व सुवर्णकार संघटना,५) कापड व रेडीमेड व्यापारी असोशियन६) किराणा व भुसार संघटना,७)स्टेशनरी व्यापारी असोशियन ८)प्रिंटीग प्रेस व मटेरियल संघटना,९) भांडी विक्रेता संघटना, १०) बिल्डींग मटेरियल संघटना,११)कंझ्युमर प्रॉडक्ट डिलर संघटना,१२)आडते व व्यापारी असोसिएशन,१३) ऑप्टीकल विक्रेता संघटना,१४)पुसद फोटोग्राफर संघटना१५)झेरॉक्स संघटना,१६)सायकल विक्रेता संघटना,१७)इलेक्ट्रॉनिक्स व होम अल्पायसेस संघटना १८)पेट्रोलियम प्रॉडक्ट असोसिएशन, १९)पुष्पावंती फोटोग्राफर संघटना, २०)नाव्ही संघटना,२१) ऑटोमोबाईल व स्पेअर पार्ट संघटना२२)पुष्पावंती इंडस्ट्रीज असोसिएशन,२३)लॉज संघटना,२४)मोबाईल व कॉम्प्युटर्स संघटना,२५)बिछायत संघटना सहभागी आहेत ह्या संघटना कोणत्याही एका पक्षाशी बांधील  नाहीत हे मात्र पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुसद या संघटनेला विसर पडला आसावा या संघटनेचे समाज हिताचे कोणतेही काम नाही उलट गेली अनेक वर्ष यांशहरासाठी ज्या नेत्यांनी देह झिजवला त्यांच्या वारसांना राजकारणातून उठविण्याचे षडयंत्र काही व्यापारी या संघटनेच्याया माध्यमातून करीत असल्याचे चित्र पहाच मिळत आहे.पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुसद या संघटनेच्या दुटप्पी धोरणामुळे शहराचे अर्थकारण आणि राजकारण काही अंशी ठप्प झाल्या असल्यामुळे योगाभवनावर या संघटनेने ताबा केल्यामुळे या व्यापारी भवनाचा वापर एका पक्षाच्या प्रचारासाठी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे योगा भवन ज्या कामासाठी उभारले होते त्यांनाा ते वापस करायलाा हवे अशी  शहरातील जनसामान्य माणसात चर्चा सुरू आहे. अन्यथा जागरूक नागरिकांनी अशा घटनालााा विरोध करण्यासाठीं समोर यायला हवे व अशा प्रवृत्तीला विरोध करायला हवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close