सैय्यद सलमान सर यांचा उर्दू टीचर्स असोसिएशन पुसदच्या वतीने सन्मान!

पुसद : उर्दू टीचर्स असोसिएशन,अमरावती विभागाच्या वतीने आयोजित एक दिवसीय अधिवेशन रविवारी मोठ्या उत्साहाने संपन्न पार पडला.या अधिवेशनात उर्दू शिक्षक व शिक्षणाच्या समस्यांवर, शिक्षण पद्धतीच्या सुधारणा, आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासावर सखोल चर्चा करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली या मध्ये अमरावतीची आमदार सौ.सुलभाताई खोडके,अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्री.किरण सरनाईक साहेब,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठचे कुल सचिव श्री.अविनाश असणारे साहेब अब्दुल राजिक माजी शिक्षणाधिकारी साहेब अमरावती,उर्दू टीचर्स असोसिएशन अमरावती विभाग अमरावतीचे अध्यक्ष गाझी जाहेरोश सर उपस्थित होते. याच कार्यक्रमात वेग वगळया क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल पुसदचे सैय्यद सलमान सैय्यद शेरू सरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी तसेच त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी उर्दू टीचर असोसिएशन तर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.किरण सरनाईक साहेब तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरावती शहरातील आमदार सौ.सुलभाताई खोडके तसेच अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव मा.अविनाश असणारे सर यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ,ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी सलमान सरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची प्रशंसा केली.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सैय्यद सलमान सरांनी त्यांना सन्मानित केल्या बद्द्ल उर्दू टीचर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष गाझी जहेरोश सरांचे तसेच उर्दू टीचर्स असोसिएशनचे आभार व्यक्त केले.



