ईतर

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाणा येथे विविध विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!

बुलडाणा/प्रतिनिधी: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर ( कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर, जालना व बुलडाणा), वनविभाग, सामाजिक वनीकरण, नगरपालिका आणि पर्यावरण मित्र मंडळ, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५जुन२०२३ (सोमवार) रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलडाणा शहरात विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाट्न जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, भाग्यश्री विसपुते यांनी केले.

यावेळी वनविभागाचे डी एफ ओ, अक्षय गजबिये, केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, आर एफ ओ, अभिजीत ठाकरे, व्हॉइस ऑफ मीडिया अध्यक्ष, अनिल म्हस्के, तालुका विकास अधिकारी, समाधान वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक, भुसारी, मुख्याधिकारी, नगर पालिका, गणेश पांडे, सहायक वनसंरक्षक, रणजित गायकवाड, वनपाल, एस. ए. आंबेकर, पी. आर. मोरे आणि ए. ए. गिते, पर्यावरण मित्र मंडळाचे अनु मोकाने, प्रदीप डांगे, प्रिया सोनुने, सोहम कुंभार, ओम कुंभार, सार्थक डांगे, दिपक पाटील, चंद्रकांत काटकर, निलेश शिंदे, मुकुंद वैष्णव, मुकुंद जोशी, गोपालसिंग राजपूत, किरण देशपांडे, परेश देशपांडे, आनंद पाटील, गौरव राठोड, रवी गणेशे, युवराज वाघ, रणजित राजपूत, मनजीत राजपूत, संदेश बावस्कर, प्रियंका सुरोशे, योगेश सुरोशे, जयंत दलाल, स्वाती दलाल, मिलिंद चिंचोळकर, गजू कळमकर, शेखर आंबेकर, विजय सिरसाट, शितल सिरसाट, ओम सिरसाट, अनन्या सिरसाट, जान्हवी पाटील, निर्मल पंजाबी, रश्मी पंजाबी, रोनक पंजाबी, दिशा पंजाबी, सनी पंजाबी, स्नेहा पंजाबी, अलिशा पंजाबी, गौरव मदान, मोनीश मदान, संगीता मदान, समीर झंवर, आकांक्षा झंवर, सरक्षी दलाल, अनंता लहासे, डॉ. आशिष खासबागे, शैलेश खेडकर, नितीन राऊत, गणेश राऊत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत लोकशिक्षण बहुदेशीय सांस्कृतिक मंडळ, बुलडाणा तर्फे गीतांच्या माध्यमातून जनजागृतीपर व प्रोत्साहन पर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गांधी भवन येथून सुरू झालेली रॅली शहरातील विविध भागातून फिरून जिल्हा स्त्री रुग्णालय येथे समाप्त झाली. त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणानंतर सर्वांनी एकत्रित पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, शरद सदिगले व प्रभात कुमार तसेच पर्यावरण मित्र मंडळाचे अनु मोकाने, प्रदीप डांगे, दिपक पाटील, मुकुंद वैष्णव, गोपालसिंग राजपूत आदींनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close