श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुमेध जाधव ची युपीएससी परीक्षेत झेप!

पुसद: स्थानिक श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. सुमेध मिलींद जाधव यांनी १२वी विज्ञान शाखेत उत्कृष्ट गूण मिळवून मुंबई येथील जे जे शासकीय रुग्णालयात एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण करून डाॅ. सुमेध यानी यूपीएससी परीक्षेत उंच झेप घेऊन देशभरातून ६८७.वी रॅक पटकावली आहे. त्यांच्या या यशाने पुसद बरोबरच श्री शिवाजी उच्यमाध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उतूंग यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर व सचिव सौ अश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी सुमेध जाधव चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शूभेच्छा दिल्या. त्याबरोबरच प्राचार्य विजय उंचेकर, रविकुमार मस्के, प्रा. गजानन जाधव, अतीश पत्रे,प्रविण ढवळे यांनी त्यांच्या घरी जाऊन आई वडील व सुमेध जाधव यांचे अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.



