ईतर

ऊस तोडणीच्या उचलीवरून मुकादमाचे अपहरण करून महिलेची निर्घृण हात्या; खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खळबळजनक घटना!

पुसद:तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसंतवाडी येथील ऊस तोडणीच्या उचलीवरून मुकादमाचे अपहरण करून मुकडदमाच्या पत्नीची चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसंतवाडी येथील मुकडदम निरंजन राठोड याने मराठवाड्यातील एका कारखान्याचे काही वर्षांपूर्वी ऊस तोडणीला मजूर पुरविण्यासाठी ५ ते ६ लाख रुपये उचलले होते. पैसे घेऊनही निरंजन राठोड याने ऊस तोडणीसाठी मजूर पाठविले नाही.मुकडदम निरंजन ने घेतलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम काही महिन्यांपूर्वी परत देखील केली होती.उर्वरित रक्कम देण्यासाठी निरंजनकडून टाळाटाळ होत आसल्यामुळे पैसे का परत दिले नाही, या व्यव्हारातुन दि.७ जुलै २०२३रोजी रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास वसंतवाडी येथे चार ते पाच लोक चारचाकी स्कार्पिओ गाडीमध्ये येवून त्या मूकडदमास मारहाण करीत वाहनांमध्ये अपहरण करून नेत असताना गाडीमध्ये पसार होत असतांनाच निरंजनची पत्नी वाहनाच्या समोर उभी झाली.वाहन आडविल्याचे पाहून सदर वाहनचालकाने महीलेस धडक देऊन चार ते पाच जण वाहनातून उतरून धारदार शस्त्राने तिच्या शरीरावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या अनिताचा जागीच मृत्यू झाला व मुकडदमाचे हपहारण करण्यात आले.नवऱ्यांला सोडविण्याच्या नादात पत्नी अनिता निरंजन राठोड वय३७वर्ष या महिलेला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण वसंतवाडी परिसरात शोककाळ पसरली आहे.तर मारेकरी वाशिमच्या दिशेने पसार झाल्याची माहिती आहे.सदर घटनेची फिर्याद खंडाळा पोलीस स्टेशन येथे मुकडदम निरंजन राठोड यांचा भाऊ अरुण राठोड यांनी दिली असुन चार ते पाच जणांविरोधात खंडाळा पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.निरंजनचे अपहरण करून वाशिम मार्गे मेहकर कडे स्कार्पिओ वाहनांमध्ये पसार झाले असताना चार ते पाच जणाला पकडण्यासाठी खंडाळा पोलिस स्टेशनचे एक पथक तात्काळ मेहकर मार्गे रवाना करण्यात आले असून वृत्तलिहोस्तोवर या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश चावडीकर यांनी दिली आहे. परंतु आरोपीचे संपूर्ण नाव अजून कळाले नाही खंडाळा पोलिसांनी अनिताचे शव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दि.८ जुलै २०२३ रोजीच्या सकाळी शवविच्छेदनाकरिता आणले होते. शवविच्छेदना नंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांचा एक मुलगा नागपुर येथे शिक्षणाकरिता असल्याने मृत महिलेचा पती व त्यांचा मुलगा आल्यावरच दुपारी सुमारे चार च्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. वसंतवाडीत घडलेल्या संतापजनक घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसंतवाडी जवळील मारवाडी फाट्याच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील जंगलामध्ये दि.८ जूलै २०२३ रोजीच्या दुपारी रुग्णवाहिकेत महिलेचे शव घेऊन पोलिस उभे होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसडीपीओ व खंडाळा पोलीस स्टेशनच्या ३०ते३५ पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा  तैनात करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close