ईतर

पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनास लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांची भेट!

पुसद: तालुका संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्या संदर्भात पुसद पंचायत समिती समोर भव्य आंदोलन करण्यात आले.यामधे थकीत इंटरनेट बिल संगणक परिचालकाना सुधारित आकृतीबंधात समाविष्ट करून घेणे. समावेश होत नाही तोपर्यंत २० हजार रुपये मानधन देणे. प्रोजेक्ट व्यतिरिक्त कामे दिल्यास त्याचा वेगळा मोबदला देणे. कंपनी व शासनाने दिलेली चुकीची टार्गेट पद्धत बंद करणे. मानधन जमा करणे. व मिळत असलेला मानसिक त्रास बंद करणे इत्यादी मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.

 हेआंदोलन हे२८ नोव्हेंबर रोजी  जिल्हा परिषद यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले असून, दि.४ डिसेंबर२०२३ रोजी राज्यातील सर्व  आमदार व खासदार यांचे घरासमोर धरणे आंदोलन होणार आहे. आणि या सर्व आंदोलनाचा शासनाने विचार न केल्यास दि.११ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल असे तालुकाध्यक्ष अरुण बरङे यांनी सांगितले.

 

या धरणे आंदोलनाला पुसद विधानसभेचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर प्रभारी गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी भेट दिली व सकारात्मक चर्चा केली व तुमच्या मागण्या पूर्तता करण्यासाठी हााा विषय हिवाळी अधिवेशनात मानण्याचे आश्वासन दिले.

 या आंदोलनात पुसद तालुका संगणक परिचालकाचे  तालुकाध्यक्ष अरुण बरडे, उपाध्यक्ष सचिन ठाकरे, सचिव शरद पवार, संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व केंद्रचालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close