ईतर

कृषी दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्त आंदोलन;स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार- प्रदेश प्रवक्ता मनीष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना!

पुसद :राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एल्गार पुकारला आहे.१ जुलै पासून शेतकऱ्यांचे आराध्य दैवत हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या त्यांच्या जन्म गावी गहुली येथे जयंतीनिमित्त पर्वावर कृषी दिनाचे औचित्य साधून स्मृतीस्थळाला अभिवादन करून शेतमालाला हमीभाव , अतिवृष्टी , कोरडा दुष्काळ , कर्जबाजारीपणा , सततची नापिकी , बदलत्या हवामानात घटत असलेली कृषी उत्पादकता , नैसर्गिक आपत्ती अशा दुष्काळाच्या दृष्ट चक्रात मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या व शेतकऱ्यांना सत्ताधारी केंद्र शासनाचे कृषिद्रोही धोरण मारक ठरत आहे या कारणाने मानसिक तणावाखाली येऊन शेतकरी आत्महत्येची वाट धरतोय , राज्य शासनाने शेतकऱ्यांची दुरवस्था लक्षात घेता शासन धोरणातून दुर्लक्षित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून विज बिल माफ करण्यात याव हि विधायक व रचनात्मक मागणी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातबारा कोरा हे अभियान हाती घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार श्री राजूभाऊ शेट्टी साहेब संदीप जगताप प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहून या कर्जमुक्त अभियान व आंदोलनाची सुरुवात गहुली या गावातून करणार वसंतराव नाईक साहेब यांनी माती आणि मातीतल्या माणसावर जीवापाड प्रेम केले हे संपूर्ण देशाला सर्वश्रुत आहे प्रतिकूल परिस्थितीत या महाराष्ट्राला सावरून कृषी क्षेत्राला चालना दिली असून कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या ऋणातून हा महाराष्ट्र कधीही मुक्त होणार नाही या उदात्त भावनेतून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्त योजना राज्य शासनाने कर्जमुक्त करून त्यांचे नाव या योजनेला देण्यात याव अशी विधायक मागणी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे शेतकरी नेते मनीष जाधव प्रदेश प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या आंदोलनाच्या संदर्भाने माहिती देत असताना मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारी करिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा डॉ प्रकाशराव पोफळे उच्च अधिकार समिती , प्रदेश प्रवक्ता मनीष जाधव , किसनराव कदम , प्रा शंकरराव राजेगोरे रावसाहेब अडकिने हिंगोली जिल्हा अध्यक्ष , विश्वजीत लांडगे जिल्हा अध्यक्ष संजू भाऊ कुंभारे प्रेमराव सरगर तालुकाध्यक्ष धीरज भाऊ पांडे सुभाष बाबर , अमोल देशमुख युवक जिल्हाध्यक्ष यांनी माजी मंत्री मनोहरराव नाईक साहेब व ययाती भाऊ नाईक यांची भेट घेऊन या कार्यक्रमाच्या संदर्भाने माहिती देऊन औपचारिक भेट घेतली .

व या मागणीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या स्वाभिमानीच्या शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने गहुली गावी जाऊन स्मृतिस्थळाला कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत भेट देऊन पूर्वतयारीसाठी पाहणी केली तेलंगाना राज्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले

तर आर्थिक दृष्ट्या समृद्ध प्रगत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या व आर्थिक विवेचना लक्षात घेता राज्य शासनाने तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्ज कर्जमुक्त करावे या आपल्या न्याय हक्क अधिकाराच्या लढ्यात सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे अस आवाहन शेतकरी नेते मनीष जाधव प्रदेश प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close