ईतर

डॉ. प्रिया शेजुळे यांची इस्रोच्या संशोधन शास्त्रज्ञपदी निवड झाल्याबद्दल पुष्पावंती नगरीत त्यांचा भव्य नागरी सत्कार!

पुसद : शहरांतील रहिवासी असलेली सध्या पुणे येथे कार्यरत असलेल्या डाॅ.प्रिया शेजुळे यांची नुकतीच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये संशोधन शास्त्रज्ञ पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार प्रज्ञासुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनपर्व समीती पुसद च्या वतीने हॉटेल दिपसंध्या पुसद येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थित हा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला.

या नागरी भव्य सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्पंदन हॉस्पीटलचे संचालक प्रसिध्द ह्रदयरोग तज्ञ डाॅ.राहुल भगत होते तर प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, प्रसिध्द ऊद्योजक व रमाई उद्योजक पुरस्कार प्राप्त तथा प्रबोधन पर्व समीतीचे अध्यक्ष विठ्ठलरावराव खडसे, संतोष सुरवाडे राज्य प्रशिक्षण महासचीव बामसेफ, प्रो.डाॅ.कल्याण साखरकर.बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटनेचे सहसचिव ,माजी जी. प.सदस्य सुरेश धनवे, महात्मा फुले समता परीषद पुसदचे अध्यक्ष आत्माराम जाधव, जमाते ईस्लामे हिंद संघटनेचे जिल्हाअध्यक्ष शेख नईम सर हे होते. कार्यक्रमाच्या सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतीमेला पुष्पहार व पुजन करून अनेक उपस्थीत वक्ते यांनी मार्गदर्शन पर आपले मत व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्यातील कार्यक्रमात सत्कारमूर्ती सत्कारास ऊत्तर देतांना समाजातील प्रत्येकजण आपल्या अविरत प्रयत्नशील असेल आणी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषाचे विचारावर वाटचाल करीत असेल तर तो नक्कीच आपल्या क्षेत्रात यशस्वी होत असतो क्षेत्र कुठलेही असोत सातत्य आणी परीश्रम हे महत्वाच असत. मी देशासाठी काम करतेय हीच भावना प्रत्येकजणानी जपायलाच हवे या सत्काराने मी भारावून गेलेय मला खुप आनंद होतोय असेच सत्कार बहुजन समाजातील मुलांचे व्हावेत एवढ यश त्यानी संपादन करावेअशीच माझी अपेक्षा आहे असे गौरवोद्गार सत्कारास उत्तर देताना डाॅ.प्रिया शेजुळे यानी व्यक्त केले.तर समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा चिकित्सक पने तयार व्हावेत असे मत डाॅ.राहुल भगत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.तर प्रज्ञा आणी शिल याचा सुरेख संगम आणी विद्यार्थ्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा हेच यशस्वी जीवनातील महत्वाचे टप्पे आहेत असे विचार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.अनेक सामाजिक संघटना कडुन डाॅ.प्रीया शेजुळे यांचा सत्कार करून भविष्यकाळातील आव्हान यशस्वीते साठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञासुर्य ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनपर्व समीती पुसद कडून करण्यात आले होते तर कार्यक्रमास .डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्था पुसद, बुद्धिस्ट ईटरनॅशनल नेटवर्क, संभाजी ब्रिगेड ,बामसेफ, भीम आर्मी,जमाते इस्लामे हिंद संघटना, संघटना, भारतीय बौद्ध महासभा, तथागत नगर बौद्ध विहार समीती सह अनेक शिक्षक, कर्मचारी तथा समाज बांधव मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंबादास वानखडे यांनी तर आभार प्रबोधनपर्व समीतीचे सचिव लक्ष्मण काबळे यानी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी प्रबोधन पर्व आयोजन समीतीचे विशाल पडघने, नितेश खंदारे, दिनेश खांडेकर,दिनेश सावळे,भास्कर बनसोड,संतोष अंबोरे, विक्की कांबळे यानी परीश्रम घेतले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close