अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, आसरपेंडच्या१०० टक्के निकालाची परंपरा कायम

पुसद: येथील सामाजीक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेली अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, आसरपेंड या शाळेचा नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ मध्ये १०० टक्के निकाल लागला आहे. यावर्षी शाळेमधून परीक्षेसाठी ३७ विद्यार्थिनी प्रविष्ट झालेल्या होत्या. सर्वच विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेल्या असून, ३१ विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणीत तर ०६ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.शाळेतून प्रथम कु. कोमल विनोद रणवीर ८९.२० टक्के, द्वितीय कु.प्रतीक्षा माधव कांबळे ८७.८० टक्के तर तृतीय कु. श्रद्धा गजानन डोंगरे ८७.२० टक्के घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.सर्व उत्तीर्ण विद्यार्थीनींचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यवतमाळ भाऊराव चव्हाण साहेब, विशेष अधिकारी शानिशा, तिजारे मॅडम , कार्यालय अधिक्षक नांदुरकर सर,समाज कल्याण निरीक्षक सौ. मीनाक्षी मोटघरे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता घरजारे(ठाकरे) , सहा शिक्षिका श्रीमती अमृते, सहायक शिक्षक, नाईक सर, .पवार सर, लिंबे सर, चव्हाण सर, प्रयोगशाळा सहायक श्रीमती लढे, कनिष्ठ लिपिक जगताप, या सर्वांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस विद्यार्थिनींच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



