क्राइम

थरारक! धनसळ येथे चाकुने इसमाचा गळा चिरून निघृणपणे खून!

  • पुसद:तालुक्यातील धनसळ येथे ता.२५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायतच्या आवारात ३७ वर्षीय इसमाची गळा चिरून निघृणपणे खुन करण्यात आल्याची खळबळजनक घटना सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलीआहे.
  • याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील धनसळ येथे ग्रामपंचायतीच्या आवारात सुरेश कवडे वय ३७ वर्ष व प्रवीण सात्विक थिटे वय २६ वर्ष रा.धनसळ हे दोघेजण बसले असताना घटनेतील आरोपी हा त्यांच्या मागून आला व सुरेश कवडे याच्या केसाला पकडून धारदार चाकूने सुरेश कवडे याचा निरघृण गळा चिरण्यास सुरवात करीत होता त्यावेळी बाजूलाच बसून असलेला प्रवीण सात्विक थिटे हा सुरेश कवडे यास वाचवायला गेला असता आरोपीने त्याच्यावर सुद्धा चाकूने हल्ला चढवला त्यावेळी प्रवीण सात्विक थिटे याच्या गालावर आणि डोळ्याजवळ चाकुचे घाव लागल्याने तोही गंभीर जखमी झाला तर आरोपी हल्ला करून घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. सदर घटनेची माहिती गावांत वाऱ्यासारखी पसरली व घटनास्थळी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली व सुरेश कवडे व प्रवीण सात्विक थिटे यांना नागरिकांनी तात्काळ पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सुरेश कवडे यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.सदर घटनेचा पोलीसांनी पंचनामा करून सुरेश कवडे यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. व प्रवीण सात्विक थिटे यास मेडिकेअर हॉस्पिटल येथे पुढील उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. त्याची सुद्धा प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांमार्फत सांगण्यात आले आहे. घटनास्थळी पुसद पोलीस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनास्थळाचे निरीक्षण केले.मीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश राठोड व पोलीस कर्मचारी अधिक तपास करीत आहे.पसार झालेल्या आरोपीचा शोधकार्यासाठी पोलीसाचे पथके रवाना झाले आहे.सदर घटना उसनवार पैशाच्या वादावरून घडल्याचे सांगण्यात येत तरीही ही दुसऱ्या कारणाने घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close