दोनदा उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने महिलेचा पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न!

महागाव/प्रतिनिधी:तालुक्यातील मौजा अनंतवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाईप लाईनच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार अनंतवाडी गावातील रहिवासी सिमा वानखेडे यांनी तक्रार आज पावेतो तिन वेळा संबधीत विभागास निवेदन देऊनही आणि दोन वेळा उपोषण करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने त्यांनी आज पंचायत समिती कार्यालय समोरच आत्मदहन करायचा प्रयत्न केला वेळीच पोलीस हजर असल्यामुळे पुढील अनर्थ टळला दि.२४ जुलै २०२३रोजी पंचायत समिती महागाव कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागलेले होते.
सिमा वानखेडे यांनी सदर प्रकरणाला वाचा फोडत १९ ऑग. रोजी पहिले निवेदन दिले होते, त्यानंतर त्यांना या प्रकरणात तिन वेळा निवेदन दयावे लागले, निगरगट्ट प्रशासनाने कुठलीच कार्यवाही न केल्याने शेवटी ०१ मे रोजी पंचायत समिती महागाव समोर उपोषण थाटले होते , आपली मागणी जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असेअसे तक्रारीत नमूदही केले होते ,या प्रकरणात महागाव पंचायत समितीचे बिडीओ यांनी तक्रारदार सीमा यांचे निवेदन स्वीकारून त्यांना एका महिन्याच्या आत संपूर्ण चौकशी करून हे प्रकरण निकाली काढू असे लेखी आश्वासन दिले होते, पण त्यावर सदर शासनाचे कुठलीच ठोस भुमिका दिसत नसला मुळे सिमा वानखेडे यांना दुसऱ्यांदा उपोषण केले ,पहिला उपोषणानंतर आलेल्या चौकशी दरम्यान सीमा वानखेडे यांना विश्वासात न घेता थातूरमातूर चौकशी केल्याचा आरोप सीमा वानखेडे यांनी केला होता, ही थातूरमातूर चौकशी त्यांना आणि जनतेस मान्य नसल्याचे सांगून पुनश्च उपोषणास बसल्याचे त्यांनी नमुदही केले,आज दोन उपोषणानंतरही त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी सरळ आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला असून जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या कृती शून्य कारवाई तसेच कामकाजावर सडेतोड प्रश्नचिन्ह निर्माण केले.



