राजकिय

पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बंडखोरी; युवानेते ययाती नाईक मोठं शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे युवानेते ययाती नाईक यांनी केले आवाहन!

पुसद: विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे युवानेते माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र ययाती नाईक उद्या ता. २९ ऑक्टोंबर २०२४ रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी हजारोंच्या संख्येने गुलाल उधळत उपस्थित रहा, असे मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी व जनतेला आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. सकाळी १० वाजता पुसद शहरातील माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून भव्य रॅलीने शक्तिप्रदर्शन करत ते आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईकांच्या घरात उभी फूट पाहायला मिळत आहे. माजी आमदार इंद्रनील नाईक यांनी वेळोवेळी त्यांना डावल्यामुळे नाईकांचे दोन्ही पुत्र या निवडणुकीत आमने-सामने भिडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. युवानेते ययाती नाईक यांचा पुसद मतदार संघात दांडगा संपर्क असल्याने विधानसभा निवडणुक लढण्याचा मानस उराशी बाळगलेला आहे.ययाती नाईक हे पुसद विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्य माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते; परंतु राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ही उमेदवारी शरद मैद यांना जाहीर केल्याने ययाती नाईक यांना दावल्याने हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यास इच्छुक असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. गावागावांत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निरोप दिले आहेत. उद्या (ता. २९) सकाळी १०:०० वाजता ते मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close