पुसद वाहतूक उपशाखेच्या वतीने ‘ऑल आउट ऑपरेशन’ अंतर्गत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांचा विरोधात कारवाई!

पुसद :वाहतूक उपशाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून’ऑल आऊट ऑपरेशन’ रबविण्यात आले असून वाहतूक वाहन कायद्यांची पायामल्ली करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह अन्वये तीन गुन्हे दाखल झाले असून ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या सहाजणां विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत पुसद वाहतूक शाखेच्या पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,पुसद येथे दि.२७फेबरवारी २०२६ च्या रात्रीवेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या वतीने ‘ऑल आउट ऑपरेशन’ राबविण्यात आले त्यामध्ये मोटर वाहन कायद्याचे पालन न करणारे वाहन चालकांविरूध्द कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह अन्वये ०३ कार्यवाही, तर ट्रिपल सीट वाहन चालविणारे चालकांवर ०६ सहजनाविरुद्ध कार्यवाही करण्यात आली.ही कार्यवाही करण्यात आलेल्या सर्व वाहन चालकांना पो. स्टे. पुसद शहर येथे मोटर वाहन कायद्याचे पालन करणे बाबत मार्गदर्शन केले. तसेच नागरीकांनी वाहतूक नियमांचे व प्रचलित कायद्याचे तंतोतंत पालन करूनच वाहन चालवावे असे वाहतूक पोलिसाच्या वतीने नागरीकांना आवाहन करण्यात आले.मात्र पुसद वाहतूक उपशाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी समाधानकारक कारवाई केली असली तरीही या वाहतूक उपशाखेकडे अधिकाऱ्यांची व कर्मचारी वर्गाची कमतरता आहे.या वाहतूक उपशाखेकडे जवळपास २१ कर्मचारी आहेत त्यामध्ये तीन-चार वाहतूक पोलीस कर्मचारी हे कार्यालयात बसत असतात तर काही कर्मचारी आपल्या वैयक्तिक कारणास्तव कर्तव्य बजावताना दिसत नाहीत तर दुसरीकडे काही वाहतूक पोलीस कर्मचारी हे शहराबाहेरील एखाद्या रस्त्यावर दंड वसूली करतात परंतु या वाहतूक उपशाखेने शहरातील मुख्य चौक हे मात्र रामभरोसे सोडल्याचे चित्र पाहावयास मिळते या वाहतूक उपशाखेचा कारभार फक्त मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरू असल्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होताना दिसून येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी जर योग्यरित्या वाहतूक नियमाची पायामल्ली करणाऱ्यावर कारवाई केली किंवा दंड न भरलेल्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची केली तर अवैध वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात लगाम लागेल.आणि एक विशेष वसुली मोहीम राबविण्याची गरज आहे. दंड वसुलीसाठी वाहनचालकांना डिजिटल नोटिसा पाठवाव्यात. मोठ्या थकबाकीदार वाहनधारकांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया राबवावी असे मत जागरूक नागरिक व्यक्त करीत असुन त्यामुळे शहरातील मुदतबाह्य गाड्याही कमी होतील व शासनाला महसूलही जमा होईल.तर सदर मोटर वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकां विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, अशोक थोरात, मा अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार दिल्याने तसेच हर्षवर्धन बी. जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद उपशाखेच्या वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.



