ईतर

संवेदना सोशल फाऊंडेशनने केली गरजूला मदत! वाढदिवस,वर्धापनदिन व गरजूला मदत असा साधला त्रिवेणी संगम

पुसद : गरजू विद्यार्थीनीला आर्थिक मदत करुन संवेदना सोशल फाऊंडेशनचा वर्धापनदिन बुधवारी(ता.२०) मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.गेल्या सहा वर्षांपूर्वी उपक्रमशील व विज्ञान शिक्षक चंद्रकांत ठेंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जमलेल्या मित्रांनी दरमहा निधी गोळा करुन गरजूंना मदत करण्यासाठी संवेदना सोशल फाऊंडेशनची निर्मिती केली व दरवर्षी गरजूंना मदत करीत आहेत.त्यामध्ये दोन्ही किडण्या निकामी झालेल्या महाविद्यालयिन विद्यार्थ्यास मदत, श्रीरामपूरातील बाळासाहेब देशमुख सवनेकर चौकात सी.सी.टी.व्ही प्रणाली कार्यान्वित,गरजू विद्यार्थीनीला सायकल,आपत्ती ग्रस्तांना मदत,शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट व दंतरोग तपासणी शिबिर,गणवेश व लेखन साहित्य वाटप,वृक्षारोपन आदी सामाजिक कार्य केले आहेत.यंदा सहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून येथील नवचंडिका सभागृहात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली गरजू विद्यार्थिनी वैष्णवी गजानन देशमुख हिला सात हजारांचा धनादेश माजी जि.प.सदस्य शिवाजी देशमुख सवनेकर,निवृत्त बॅंक अधिकारी नारायण जाधव,संवेदना फाऊंडेशनचे सदस्य,राष्ट्रीय शिक्षक पुरस्कृत माजी शिक्षक यशवंत देशमुख,गुणवंत आसेगांवकर, चंद्रकांत ठेंगे,हरगोविंद कदम,जितेंद्र चिद्दरवार,शिवाजी कदम,प्रताप पतंगे,फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष मोहन बोजेवार, सचिव शशिकांत जामगडे,रंजित देशमुख आदींच्या उपस्थित प्रदान करुन मदतीचा हात दिला.
यावेळी श्री.ठेंगे यांनी संवेदना सोशल फाऊंडेशनला दरमहा निधी देण्याबरोबर वाढदिवसाचे औचित्य साधून एक हजार रुपयांची देणगी दिली व सर्व सदस्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करुन अतिरीक्त निधी देण्याचे सदस्यांना आवाहन केले.
सचिव शशिकांत जामगडे यांनी संवेदना सोशल फाऊंडेशनच्या कार्यावर प्रकाश टाकून फाऊंडेशनला सर्वसामान्य नागरीक मदत निधी देण्यासाठी पुढे येत असल्याचे सांगत सभेत ठरल्यानुसार प्रत्येक सदस्यांकडून १२०० ₹ सदस्य फी जमा करणार असल्याचे सांगितले.
संवेदनाच्या कार्याने प्रभावित होऊन सदस्य नसलेले नारायण जाधव यांनीही दरमहा शंभर रुपये प्रमाणे वार्षिक १२०० रु देणगी दिली.वर्धापनदिन, गरजूला मदत व वाढदिवस असा त्रिवेणी संगम साधल्याबद्दल अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर,उपाध्यक्ष गणेश धर्माळे,मनिष जयस्वाल,किरण वा. देशमुख, अॅड.कैलास राठोड, हरिभाऊ ठाकरे,प्रभाकर टेटर, अविनाश अडकिने ,अमोल शिंदे, प्रा. अजय क्षीरसागर,विवेक बैस्कार, मोहन भालेराव, साहेबराव राठोड, गिरधर ठेंगे, प्रसाद केशट्टीवार, अनंता पतिगंराव,स्वप्निल देशमुख,रोहन पारध आदींनी वर्धापनदिन,वाढदिवस व गरजूला मदत समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close