को दौ विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम;शाळेचा निकाल९८.०२ टक्के!४५६ पैकी ४४७ विद्यार्थी उत्तीर्ण!पार्थ मंगेश पारटकर ९५.८०% गुणांसह प्रथम
३५ विद्यार्थ्यांनी पार केली नव्वदी

पुसद:गुणवत्ता शिस्त व संस्काराची पायाभरणी करणारी येथील मातृशाळा कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली आहे.नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या निकालात तब्बल 35 विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत ९५.८०% गुन्हा सह पार्थ मंगेश पारटकर हा विद्यालयातून प्रथम आला आहे तर कोमल भागवत घुगे आणि जान्हवी भागवत हुडेकर यांनी ९५.६०% गुण मिळवीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.९५.२० % गुणांसह देविदास सुदाम आडे तृतीय स्थानी आहे.शाळेचा निकाल ९८.०२ टक्के आहे. ४५६ विदयार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ४४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने दहावीची परीक्षा देणारे जिल्ह्यातील एकमेव विद्यालय आहे.संस्थेचे अध्यक्ष राजेश कोटलवार यांच्या मार्गदर्शनात व नियोजनात विद्यालयाने आजही आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे,उपमुख्याध्यापक रिता बघेल, पर्यवेक्षक मनोज नाईक, अनंत जाधव, बलराम मुराडी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.संस्थेचे आधारस्तंभ तथा शाळा समिती सभापती बाळासाहेब मुखरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता सातत्याने प्रयत्न केले आहेत. संस्थेचे सर्व पदाधिकारी तथा संस्थेच्या सर्व शिक्षक व पालकांच्या सामूहिक प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.



