Uncategorizedईतर

पुसद शहरातील भाजी मार्केट घाणीच्या साम्राज्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; राकाँ शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद मैंदं यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आणला चव्हाट्यावर!

नागरिकांच्या जेवणाच्या ताटातील भाजिपाला देतोय आरोग्याला आमंत्रण!

पुसद : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती प्रांगणात भरणाऱ्या भाजी मंडीतील प्रचंड असुविधांचा भंडाफोड काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरदचंद्र पवार)पक्षातर्फे प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

या असुविधांची तात्काळ दखल घेण्याबाबत पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.त्यानुसार बिकट अवस्थेत असलेले पुसद तालुक्यातील अनेक शेतकरी आर्थिक हातभार लागावा म्हणून भाजी उत्पादन करीत आहेत. तालुक्यातील शेवटच्या टोकापासून शेतकरी भल्या पहाटे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मंडी मध्ये भाजी विक्री साठी येतो. मात्र भाजी ची हर्रासी होते त्या आवारात असंख्य असुविधांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो.

पावसाळ्याच्या दिवसात या परिसरात मोठया प्रमाणात चिखलाच्या साम्राज्यमध्ये मच्छर व अन्य कीटकांच्या सानिद्यात सकाळी ५ते ८ वाजेपर्यंत हर्रासी सुरु असते. त्याचा या परिसरात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडतो. तसेच चिखलमय जमिनीवर भाजी ठेऊन हर्रासी होत असल्यामुळे ही भाजी उपयोगात आणणाऱ्या हजारो नागरिकांच्या आरोग्यावर विपारीत परिणाम होत आहे.

चिखलमय जमिनीवरुन भाजी भरलेले कटले, हातगाडे ओढण्यासाठी त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या संपूर्ण परिसरात युद्ध पातळीवर गट्टू किंवा मजबूत काँक्रिटीकरणं करण्याची गरज आहे दूर खेडे गावावरून सकाळी ४वाजता आलेल्या ग्रामीण शेतकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी भाजी मंडी आवारात प्रसाधन गृह,, (मुतारी ),पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. भाजी मंडी परिसरात सकाळी ५ वाजता अंधारात व्यवहार सुरु होत असल्यामुळे या भागात पुरेशी लाईट व्यवस्था करण्याची गरज आहे.

शेतकरी हिताच्या वरील सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा शरद मैंद यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात अनुकूल चव्हाण, डॉ अकील मेमन, ऍड भारत जाधव, दीपक जाधव, धर्मेंद्र जळगांवकर परमेश्वर जैस्वाल, पंडितराव देशमुख, नारायण क्षीरसागर, नाना बेले,यु एन वानखेडे,दीपक तायवाडे, सतीश जाधव,के जी चव्हाण, स्वप्नील जैस्वाल,दीपक हरिमकर,जय दळवी, अजित लोंढे,आकाश साठे, देविदास शिंदे,उदय गंधेवार,कैलास जळगांवकर, चक्रधर मुळे, अरुण ठाकरे,गणेश दिंडे,उत्तम चापके,पी.के. चोपडे,,प्रवीण कदम,अक्षय तावडे, प्रथमेश रोडेकर,सय्यद नायब सय्यद हबीब,शेख आवेश,संदेश रणवीर, धीरज कांबळे,अभिमन्यू शिंदे, सौरभ मोरे,दीपक अवचार, विशाल दुधाने,विष्णू गुड्डावार,भुजंग वाढवे, ,ऍड शेख जुनेद आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शहर व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुसद तालुका एस टी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. सोसिअल मीडिया पुसद तालुका व पुसद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग पुसद तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदनातून दिला.२००६ पासुन बाजार समिती प्रांगणात मंडी सुरु झाली. १८ वर्षा पासून वरील असुविधा बाबत अनेक राजकीय, सामाजिक संघटना, वर्तमान पत्रातुन आवाज उठविल्या गेला.मात्र बाजार समिती, लोकप्रतिनिधी यांनी आजपर्यंत दुर्लक्ष करत गेले.

एक महिन्याच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास भीक मागोआंदोलनाचा अल्टिमेट!

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट मध्ये मागणी करण्यात आलेल्या  सुविधा लवकरच पूर्ण होतील काल निवेदन दिल्यानंतर बाजार समिती पदाधिकारी, सचिव यांच्या सोबत झालेल्या चर्चेत शरद मैंद यांनी ठाम ठोक भूमिका मांडल्याने येत्या काही दिवसात हर्रासी होत असलेल्या प्रांगणात गट्टू टाकले जाईल, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आर.ओ.बसविण्यात येईल तोपर्यंत दररोज सकाळी पाणी जार उपलब्ध करून दिले जातील.तसेच प्रसाधन गृह उभारे पर्यंत बाजार समिती कार्यालयातील प्रसधन गृहवापरासाठी उघडे ठेवले जाईल, प्रांगणात लवकरच पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याचे मान्य करण्यात आले. आज सकाळी पाणी जार तसेच कार्यालयचे प्रसाधन गृह उपलब्ध करून देण्यात आले हे विशेष. दरम्यान सर्व सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रवेशद्वारा वर छोटया भाजी विक्रेत्या कडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. एकूणच शेतकऱ्यांच्या संस्थेत असलेल्या असुविधा वर तडका फडकी निर्णय घेऊन त्या पुरविण्यात आल्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल. जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर भिक मागो आंदोलन करण्याचा अल्टिमेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शरद मैद यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close