ईतर

पुसदच्या कोषटवार दौलतखान विद्यालयाची यशाची परंपरा कायम ;दहावीच्या निकालासुद्धा अव्वल, तब्बल ४७ विद्यार्थ्यांनी पार केली नव्वदी

स्नेहा मस्के ९७.२० टक्के गुणांसह प्रथम तर रुणाली ठेंगे ९६ टक्के गुण घेऊन द्वितीय

पुसद : येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या दहावीच्या निकालात घवघवीत यश संपादन करून आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.तब्बल ४७ विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत गुणवत्तेची छाप उमटवली आहे.स्नेहा संजय मस्के हिने ९७.२० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे तर रुणाली राजू ठेंगे ९६ टक्के गुणांसह द्वितीय स्थानी आहे.श्रेया प्रमोद आवंडकर आणि गौरी संतोष सांगाणी यांनी संयुक्तपणे ९५.६० गुण मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले आहे.अनुष्का अनंत पतिंगराव ९५.४० टक्के गुणांसह चवथ्या आणि धनश्री किशोर तोरकड ९५ टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विद्यालयातील पहिले पंचम अग्रस्थान मुलींनी पटकाविले आहे हे विशेष.विद्यालयाचा निकाल ९५.३६ टक्के आहे.१११ वर्षांची उज्वल परंपरा लाभलेल्या विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली असून शालेय शिस्त, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि संस्कार यामुळे यश मिळाल्याचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे यांनी सांगितले.संस्थाध्यक्ष राजेश कोटलवार, शाळा समिती सभापती डॉ आनंद मुखरे तथा संस्थेच्या सर्व संचालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.उपमुख्याध्यापक रीता बघेल, पर्यवेक्षक अनंत जाधव, बलराम मुराडी तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.उकृष्ट शालेय प्रशासन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखल्याने आनंद व्यक्त केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close