शैक्षणिक

हजरत उमर फारूक (रजि) उर्दू हायस्कूल उत्कृष्ट निकालाची परंपरा २१ वर्षा पासून यंदाही कायम….

पुसद :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा परिषद पुणे मार्फत, सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत पुसद येथील हजरत उमर फारूक (रजि) उर्दू हायस्कूल निकालाची परंपरा कायम ठेवत पुसद तालुक्यातील एक नामांकित शाळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.शाळेमधून एकूण १८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून ३८ विद्यार्थिनी विशेष प्राविण्य गुण प्राप्त केले आहे , ५५ विध्यार्थी प्रथम श्रेणी तसेच ७४ द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये कु.ज़ोया फातिमा मोहम्मद साजिद बेग ९४%, नबीरा अफशा नुरूल्लाह खान ९२%, शेख मुसेफ शेख इरफान ९०% , कू. रीदा फातिमा मोहम्मद रियाज ८९ .६०%. मोहम्मद जसीम मोहम्मद जावेद ८९% जा़हेद अहमद जुनेद अहमद ८८% अंशरा फातिमा रियाज अहमद खान ८८% मिसबा सदफ अब्दुल सलीम ८८ % अमेनूस सालेहा दाऊद खान ८७.४०% हलिमा सादिया मो. अब्रार अहेमद ८७.२०% मुशफिरा परवीन अफरोज खान ८६.४०% गुण प्राप्त करून पुसद तालुक्यात शाळेचे नाव उज्वल केले आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे संचालक मंडळ मुख्याध्यापक याह्या खान सर प्राथ व उच्च प्राथ शाळा, मो. वकील सर माध्य व उच्च माध्य विद्यालय व सर्व शिक्षकवृंदानी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close