ईतर

जेष्ठ समाज सेवक माजी नगरसेवक याकूब भाई यांचा सत्कार!

पुसद: येथील जेष्ठ समाज सेवक माजी नगरसेवक याकूब भाई यांच्य  ७९व्या वाढदिवसानिमित्त सत्कार  वसंत नगर येथील रहिवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यानिमित्त शादी खाना वसनगर येथे दुपारी ४:०० वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदिनसाहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा नगरपरिषदेचे नगरसेवक शेख करीम भाई, प्राध्यापक शेख बिलाल माझी प्राचार्य शेख मोबीन अहेमद,डॉक्टर मो.जुबेर, लियाकत खान पठाण,शेख झिया हे होते.या वेळेस पाहुण्यांनी समायोचित विचार मांडत याकूब भाईच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच याकूब भाईचा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल डॉ. नदिम व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.

डॉ.नदीम यांनी अध्यक्षीय भाषणात याकूब भाई ने गोर गरीब लोकांची सेवा विशेषतः वृद्ध व जेष्ठ नागरिकांना शसनाच्या योजनेचे अनुदान मिळवून दिले या बाबत तपशीलवार माहिती दिली आणि त्यांनी गोरगरिबांची जी कामे केली त्या सर्वांची शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे म्हणून याकूब भाई ७८ वर्ष पूर्ण करून ही निरोगी व टँटणं आहे व पुढे बऱ्याच वर्ष ठणठणीत राहतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.या कार्यक्रमाला वार्डातील असंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहून याकूब भाईचे अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमात प्रमुख्याने विलास वाघमारे,रहमत ठेकेदार, पाशाभाई,एकबाल ठेकेदार,हुसेन बाई गजबंद्रीवाले,नफीस इकबाल, नाझीम राज यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन याकूब भाई चा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना याकू भाई म्हणाले की मी माझ्या परीने समाजातील गरीब घटकाची आवश्यकता सेवा केली माझ्या केलेल्या सेवेचा आज जे गुणगान केलं त्यामुळे माझा उत्साह वाढलेला आहे.

मी जीवन असेपर्यंत माझ्या परीने समाजसेवा करत राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जव्हार लाखे यांनी केलेआभार प्रदर्शन नाझीम राज यांनी केले
शेवटी केक कापून जन्मदिन साजरा करण्यात आला याकूब भाईचा जन्मदिन साजरा होत असल्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळ्या प्रकारचा आनंद पाहायला मिळत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close