पुसद: भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनी दारूचे दुकाने बंद ठेवावे अशी मागणीडॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण सहनियंत्रण समितीचे पदाधिकाऱ्यांकडून उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद तसेच उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पुसद शहरांसह तालुक्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच शोभायात्रेत समाजातील महिलावर्ग लहान मुले आबालवृद्ध यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन शोभा यात्रेमध्ये चौख पोलीस बंदोबस्त मिळावा शोभायात्रा ही सुखकर व व्यवस्थित मार्गाने जाण्यासाठी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही वाहतुक एकरी मार्गाने वळवण्यात यावी तसेच भीम जयंती दिनी देशी, गावठी, वाईन बार बंद ठेवण्याची मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण सहनियंत्रण समितीच्या वतीने निवेदनातून उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून एक प्रत दारूबंदी अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.या निवेदनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण सहनियंत्रण समिती चे अध्यक्ष विठ्ठल खडसे,सचिव लक्ष्मण कांबळे,कोषाध्यक्ष अशोक भालेराव,उपाध्यक्ष राजेंद्र नाईक ,दिनेश खांडेकर, सल्लागार सिद्धांत कोल्हे,सहसचिव अंबादास वानखेडे, मुनेश्वर हाटे, संघटक विशाल कांबळे,अंबादास वानखेडे,दिनेश सावळे,संतोष आंबोरे,महेंद्र कांबळे,नितेश खंदारे,विशाल पडघने,भास्कर बनसोड,बाबाराव ढोले आदी कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.