छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी!

पुसद : तालुक्यातील ‘वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगे बाबा स्मृती स्थळ ‘ जाधव बाग पार्डी रोड लिंबी येथेदि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी रयतेचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या वतीने मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.
माणुसकीच्या भिंतीचे सर्वे सर्वा व आदर्श शेतकरी दत्तात्रय जाधव,डॉ.सुधीर झीलपीलवार व डॉ. कैलास बजाज यांचे हस्ते राजमाता जिजाऊ व बालशिवराय यांच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन आरोग्य धनसंपदा सायकल ग्रुप पुसद व वंदे मातरम सायकल ग्रुप पुसद यांचे संयुक्त विद्यमाने पुसद वरून छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन कर्मयोगी संत ‘गाडगे बाबा स्मृती स्थळ ‘जाधव बाग पार्डी रोड लिंबी पर्यंत जवळपास १० किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य धन संपदा सायकल ग्रुपचे अध्यक्ष पवन बोजेवार यांचे मार्गदर्शना खाली केले होते.या सायकल रॅलीमध्ये डॉ.सुधीर झीलपीलवार,डॉ.कैलास बजाज,सुधाकर पुलाते आरोग्य धनसंपदा सायकल ग्रुप,वंदे मातरम सायकल ग्रुप,मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था पुसद,वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद, संभाजी ब्रिगेड महिला ग्रुप,मिशन ग्रीन चे अध्यक्ष रमेश डंबोळे माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव मधुकर चव्हाण,जगदीश सोनुने,पंजाब ढेकळे,सोनू पाटील,अनंता चतुर,अरुण नागुलकर,धनंजय आघाम,मंगेश भगत,आदित्य जाधव डॉ.सुधीर झिलपिलवार डॉ.कैलास बजाज पवन बोजेवार,निखिल गादेवार नयन रामधनी,किरण किनाके,सुरेश लव्हाळे,ओम बोजेवार,वैभव कोमावार,प्रकाश बास्टर,श्याम कुटे, सुधाकर पुलाते, बाळकृष्ण मंदाडे, राजेंद्र काळबांडे, अनिल इंगळे, दिगंबर देशमुख,गणेश सावंत सुशांत महल्ले अजय क्षीरसागर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे ठिकाणी सायकल रॅली चे आगमन होताच माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या मूर्तिचे पूजन सर्व मान्यवरांचे हस्ते केल्या नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिशन ग्रीनचे अध्यक्ष रमेश डंबोळे यांनी केले.



