ईतर

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी!

पुसद:देशभर पसरली कीर्ती ज्यांची, तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा। उदार करुणामूर्ति अहिल्यामाता रयतेस लावला तिने लळा।।माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,

भारतातील कर्तबगार स्त्रियांपैकी एक राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित साधून दिनेशजी लढ़्ढा यांच्या जन्मदिनानिमित्त प्रेमसिंग राठोड रा दारव्हा यांचेकडून माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण त्यांचे नातेवाईक व इतर गरजू यांना पोळी,भात,भाजी व जिलेबीचे जेवण देण्यात आले. यावेळेस उपस्थित मान्यवर दादाराव ढेकळे,पारडी,भिका राठोड,प्रकाश राठोड,सचिन राठोड व तसेच माणुसकीच्या भिंतीचे दत्तात्रय जाधव,गजानन जाधव,संतोष गावंडे,सोहम नरवाडे,अनंताभाऊ चतुर,धनंजय आघाम,दीपक घाडगे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close