ईतर
श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य मिरवणूक;माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सह अनेक नेत्यांची उपस्थिती!

पुसद :श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त यवतमाळच्या पुसद मध्ये आज भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हंसराज अहिर यांच्या सह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. श्याम भारती बाबा माहूर, माजी मंत्री संजय देशमुख, मोहिनी नाईक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हंसराज अहिर यांच्या हस्ते श्रीकृष्ण भगवान ची आरती करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात गोपाल कृष्ण भगवान की जय अशा घोषणा देत मिरवणूक निघाली. गेल्या दहा वर्षापासून अविरत गोपाळ कृष्ण भगवान यांची मिरवणूक काढत असल्याबद्दल माजी मंत्री हंसराज अहिर यांनी आयोजक अमोल साखरे सह समस्त गवळी समाजाचे अभिनंदन केले. भक्तिमय वातावरणाने पुसद नगरी दुमदुमली.



