ऊस तोडणीच्या उचलीवरुन मुकादमाचे अपहरण करून महिलेची निर्घुण हात्या केल्या प्रकरणी तीन आरोपींना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी!

पुसद:तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसंतवाडी येथील ऊस तोडणीच्या उचलीवरून मुकादमाचे अपहरण करून मुकडदमाच्या पत्नीची चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना दि. ७ जुलै २०२३ रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळ पठारावरील वसंतवाडी येथे रहिवासी असलेल्या निरंजन राठोड याचे अपहरण करून पत्नीची हत्या करून आरोपी वाशिम मार्गे मेहकर पसार झाले होते अपहरण करणाऱ्याला पकडण्यासाठी खंडाळा पोलीस स्टेशनची एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ आरोपीच्या शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने लोकेशनच्या आधारे अपहरण प्रकरणातील स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच १४ सी. सी. ७८६७ मध्ये निरंजनला वाशिम मार्गे मेहकर महामार्गावर असल्याचा शोध घेतला असून दि.८ जूलै २०२३ रोजी जात असताना सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणातील आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील केदारवाडी येथील रहिवासी असून यामध्ये अजय संजय सोळुंके वय २६ वर्षे,विशाल संभाजी रावते वय २८ वर्षे व रमेश बाबू कदम वय ४८ वर्षे असे ताब्यात घेतलेल आरोपींची नावे आहेत.ह्या आरोपींना दि.९ जुलै २०२३ रोजी पुसद न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दि.१५ जुलै २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून सदर घटनेचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश चावडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजाब रणखांब, अमोल सांगळे, पोलीस कर्मचारी सुनील पंडागळे,,पंकज पातुरकर, सोहेल मिर्झा, कुणाल मुंडोकार,मो.ताज ,चालक डीगांबर गीते यांनी केली



