ईतर

४८ वर्षांची परंपरा जपत रोहडा येथील आदर्श पोळा उत्साहात संपन्न;घरासमोर मेडी व करदोडा वाटप अनेक वर्षांपासून बंद!

पुसद : तालुक्यातील माळ पठारावरील रोहडा येथे सण १९७५ पासून पोळा भरविण्यात येतो. यावर्षीचा पोळा हा ४८ वा पोळा होता. या गावाचे विशेष म्हणजे या पोळ्यातील पहिल्या बैलांचा मान हा गावकरी गावात चर्चा करून पूर्वी ठरवीत होते. गावातील पोलीस पाटील राजकुमार परिसकर यांनी काही गावकऱ्यांसोबत चर्चा करत पोळ्याचा मान हा रोटेशन पद्धतीने ठेवला. प्रथम वर्षी पोलीस पाटील, नंतर सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अशा क्रमाने दरवर्षी पोळ्यातील बैलाचा मान दिला जात आहे. रोहडा येथील आठवडी बाजारात पोळा भरविल्या जातो त्यासाठी दुपारी दोन वाजेपासूनच बैल सजवून येण्यास सुरुवात होते. ज्याचा मान असेल त्यांच्या बैल जोडीला घरापासून मंदिरांचे दर्शन करत करत वाजत गाजत भजनी मंडळ आठवडी बाजारात आणतात. ज्यांचा मान आहे त्यांच्याकडून पोळ्यात आलेल्या सर्व बैलांना पुरणपोळीचा घास दिल्या जातो. संध्याकाळी ठिक चार वाजता तोरणाखाली वसुराजांचे कामधेनू शी पाच मंगलाष्टके म्हणत लग्न लावण्यात येते सर्वांना तांदूळाच्या अक्षदा दिल्या जातात. त्यानंतर क्रमाक्रमाने एक एक जोडी शांततेत मारुती मंदिरावरून गावात जातात. येथील पोळा हा सर्वधर्म समभाव जपणारा असून दरवर्षी येथे पोलीस संरक्षण न घेता गावातील मंडळी पोळा शांततेत पार पाडतात. विशेष म्हणजे पोळ्याच्या दरम्यान गावात दारूबंदी असल्याने कोणीही नशा पाणी करीत नाही .या गावाचा आदर्श म्हणजे या गावात घरापुढे कोणीही पळसाचे झाड तोडून मेडी लावत नाही तसेच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी घरोघरी दर्शनाला जातात त्यावेळी करदोडा देण्याची पद्धत होती तीही पोलीस पाटील राजकुमार पारीसकर यांच्या पुढाकाराने बंद करण्यात आली असून येथील पोळा हा आदर्श पोळा म्हणून गणल्या जाते. या पोळ्यात सुमारे दीडशेच्या वर बैल जोड्यांचा सहभाग यावर्षी दिसून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close