ईतर

माउंट लिट्रा झी स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा!

पुसद : येथील माउंट लिट्रा झी स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे योग शिबिरात सहभाग घेतले.

योग हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असून योगाचे महत्त्व जगाला समजलेले आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर २१ जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. सदर शाळेत योग दिनाच्या या कार्यक्रमास योग गुरु कन्हैयाजी विची यांनी विद्यार्थ्यांना विविध योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

व विद्यार्थ्यांना योगा करावयास लावले. तसेच योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे अकॅडमिक डायरेक्टर, मुख्याध्यापक,शाळा समन्वयक व प्रशासन अधिकारी तसेच सर्व क्रिडा प्रशिक्षक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रभारी पंकज श्रीनाथ हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अविनाश देशपांडे यांनी केले तर आभार गुरप्रित कौर भाटिया यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close