राजकिय

पुसद शहरात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन!

पुसद : ८१- विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य हे  उतरल्याने दि. ४ रोजी२०२४ रोजी शहरातील मालपाणी हॉस्पिटल समोरील कॉम्प्लेक्स मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वंचितचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकर्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य, सुरेश धनवे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुध्दरत्न भालेराव, डी. के. दामोदर, सौ. वर्षाताई वैद्य, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, शामराव व्यवहारे, संभाजी कानेकर, यशवंत कोल्हे, दिनेश आढाव, प्रमोद खंदारे मोतीराम बोडके, नारायण कराळे, यांच्यासह शेकडो वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी वंचितचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे मान्यवरांनी आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close