नाईक पिता-पुत्राला भूमाफियाकडून मारहाण झाल्याचे खळबळजनक आरोप संदीप बाजोरियांनी केल्याने त्या वक्तव्याचा पुसद येथे जाहीर निषेध; नाईक समर्थकांकडून बाजोरियांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन!

पुसद: येथील स्व. वसंतराव नाईक चौकात दि. २४ जून रोजी नाईक परिवार समर्थकांच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता लोकनेते मनोहरराव नाईक व आमदार इंद्रनिल नाईक यांच्यावर यवतमाळ येथे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे निराधार आरोप केल्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारो आंदोलन करून पुतळ्याचे दहन करण्यात आले. असून त्यांच्यावर मानहानी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार यवतमाळ येथील विधान परिषदेचे माजी आ. संदीप बाजोरिया यांनी दि. २० जून रोजी पत्रकार परिषद आयोजित करून लोकनेते मनोहरराव नाईक व आ. इंद्रनिल नाईक यांच्या विरुध्द यवतमाळच्या भूमाफियाने कॉलर पकडून मारहाण केली होती व घरही पाडण्याचा प्रयत्न केला होता. अखेर मीच मध्यस्थी केली होती अशा प्रकारचे निराधार हे खोटे बिनबुडाचे आरोप केले होते. त्यामुळे संदीप बाजोरिया यांच्या बिन बुडाच्या आरोपामुळे नाईक समर्थकांच्या भावना दुखावल्यामुळे दि.२४ जून रोजी सकाळी ११:०० वाजता वसंतराव नाईक चौकात माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करून पुतळ्याचे दहन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी पुसद येथे निवेदन देऊन त्यांच्यावर मानहानी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेकडो नाईक समर्थकांनी निषेध व्यक्त करून एकच गर्दी केली होती.
माजी मंत्री मनोहरराव नाईक व त्यांचे पूत्र आमदार इंद्रनिल नाईक यांना यवतमाळच्या एका भूमाफीयाने कॉलर पकडून मारहाण केली होती. घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. अखेर मीच मध्यस्थी केली होती, या प्रकरणात त्यांनी आमदाराच्या निकटवर्तीयांचे नावही घेतले. तसेच हे खोटे असेल तर दावा दाखल करा, किंवा कॉल डिटेल्स तपासा सत्य समोर येईल असा गौप्यस्फोट केला-माजी आमदार संदीप बाजोरीया,



