पुसद नगर परिषदेच्या घंटा गाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर; दरमहा २० लाखाचा अपहार!-माजी पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांचा खळबळजनक आरोप!

पुसद:गरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलन करुन कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी घंटागाड्या खरेदी केल्या होत्या परंतु आता या घंटागाड्या हद्दपार होण्याच्या मार्गावर असून घनकचरा उचलण्याच्या नावावर संबंधित कंत्राटदार दरमहा लाखो रुपयांचा अपहर करीत असल्याचा नगर पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधी यांनी खळबळ जनक आरोप केला आहे. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात घनकचरा उचलण्याचे काम कंत्राकदाराला कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे.परंतु शहरांमधील व्यापारी लाईन तसेच अनेक प्रभागामध्ये क्वचित प्रसंगी घंटागाड्याचे दर्शन नागरिकांना होते. दररोज घनकचरा जमा करतांना घंटा गाडी कुठेही दिसत नाही तर घंटा गाडी येत नसल्याच्या नागरीकांच्या अनेक तक्रारी येत असुन नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायाने नागरीक जिथे जागा दिसेल तिथे कचरा टाकतात, त्यामुळे शहरात सर्वत्र ‘घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोग पसरत आहेत डेंग्युचे अनेक रुग्ण परिसरात आढळून येत असुन मागील काळात डेंग्युमुळे जिवीत हानी झालेली आहे.प्रत्यक्षात नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दररोज घंटागाड्यांना फिरून घनकचरा जमा करण्याचे काम सध्या बंद असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सदर काम वाय.व्ही. शिंदे, उदगीर या कंपनीला अधिकृतरित्या दिले असले तरी प्रत्यक्षात काम करणारी व करवून घेणारे माजी नगरसेवक ठेकेदार असल्यामुळे घंटा गाडया पुसद शहरात फिरो या न फिरो देयके मात्र दरमहा २० लक्ष रुपये २४ घंटा गाड्यासाठी देण्यांत येत आहेत. आरोग्य विभागामार्फत फिरणारी ही घंटागाडी कागदावर मात्र प्रत्येक प्रभागात दिवस्तकाठी ४ वेळा फिरते परंतु प्रत्यक्षात प्रभागात मात्र सात दिवसातून एकवेळही दिसत नाही. या शिवाय २७ कंत्राटी सफाई कामगारांचेही बिल अदा करण्यांत येत आहे तसेच कचरा संकलन करुन प्रक्रिया करण्यांचेही बिल अदा करण्यात येत आहे मात्र त्यावर कुठलीही प्रक्रिया केल्याचे दिसुन येत नाही. त्यांचे देयके कोणतीही शहानिशा न करता नियमितपणे अदा करण्यांत येत आहेत. त्यासाठी शहानिशा न करण्याचे वाढीव रक्कमही संबंधितांना देण्यात येत आहे. असाच प्रकार नगरपालिकेच्या इतर विभागातही मोठया प्रमाणावर सुरू असुन नगर पालिकेचे आर्थिक नियोजन पूर्णतः विस्कळले असुन संबंधितांची वचक राहिला नसल्यामुळे सर्वत्र बोगस विलांना ऊत आला आहे. जर या चार दिवसात संपूर्ण पुसद शहरातील घंटा गाडया व सफाई कामगार करण्यात यावी अन्यथा तसेच संबंधितांवर कार्यवाही करुन काम न करता लाटलेली बिले वसुल करण्यांत यावे. जर ही परिस्थिती चार दिवसात सुधरली नाही तर तिव्र आंदोन छेडण्यात इशाराही संबंधित प्रशासनाला देण्यात आला आहे.



