ईतर

हिवरा संगम येथील त्या पूरग्रस्तांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : तर आनंदनगर येथे मदत व पुनर्वसन मंत्र्यासह आमदार खासदारांच्या भेटी!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम):-महागाव तालुक्यात दि.२१ व २२ जुलैला ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पूर परिस्थिती होती नदी नाले एक झाल्यामुळे अनंदनगर बेटाला येडा पडला होता अनेकांनी अडकलेल्यांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाल कळविले त्यानंतर एसडीआरएफ जवानांनी त्यांना बोटीने बाहेर काढले हेलिकॉप्टर सुद्धा आले होते त्यामुळे राज्यात आनंदनगर हे गाव हायलाईट झाले तर हिवरा संगम येथील ३५ ते ४० पूरग्रस्त खरोखर दुर्लक्षित झाले या पूरग्रस्तांची पूर्ण घरे पाण्यात होती.

घरात ठेवून असलेले गृह उपयोगी साहित्य कागदपत्रे पूर्णपणे खराब झाली अनेकांचा संसार उघड्यावर आला या पूरग्रस्तांना विविध सामाजिक संघटनांनी आपले सामाजिक दायित्व निभावताना त्यांना किराणा किड्ससह विविध भेटवस्तू दिल्या मात्र आज दहा दिवसानंतर सुद्धा प्रशासनातील कोणताही अधिकारी कर्मचारी विभागाचे आमदार खासदार मंत्री या ठिकाणी आले नाही त्यामुळे त्या पूरग्रस्तांकडून रोष व्यक्त होत आहे.

दि.२१ व २२ जुलैला ढगफुटी पावसामुळे पूस नदीला आलेल्या पाण्यामुळे आमचे घर पूर्णतः पाण्यात होते मुलीच्या डिलिव्हरी साठी आम्ही यवतमाळ शासकीय दवाखान्यात होतो माझ्या सासूबाई एकट्याच घरी होत्या त्यांना शेजाऱ्यांनी बाहेर काढले घरातील पूर्ण कागदपत्रे, टीव्ही,फ्रिज , गहू ज्वारी किराणा पूर्णतः पाण्यात भिजला आहे अजून पर्यंत विभागाचे आमदार खासदार पालकमंत्री यापैकी कोणीही भेट दिली नाही-सौ.वनमाला गोपाल गंधेवार(पूरग्रस्त हिवरा संगम)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close