न.प.क्षेत्रातील नागरिकांना घरकुलासाठी नमुना-ड, लिजपट्टे, बेघरांना जागा व रेती उपलब्ध करुन द्या-खासदार संजय देशमुख

पुसद: नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत गेल्या ३० ते ४० वर्षापासुन वास्तव करणारे नागरीकांना त्यांचे राहत असलेल्या जागेवरच (सरकारी) त्यांच्या जागेची मोजणी करण्यात आली असून अद्यापपावेतो त्यांना नमुना-ड लिजपट्टे देण्यात आलेले नाहीत.या संदर्भात वाशिम-यवतमाळ चे लोकप्रिय खासदार श्री. संजय देशमुख हयांना त्यांचे दिग्रस येथील निवासस्थानी महाविकास आघाडीचे वतीने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तसेच वंचितचे वतीने शिस्ट मंडळ भेटून त्यांना पुसद शहरातील न.प.क्षेत्राचे अंतर्गत सरकारी जागेवर राहत असलेल्या नागरीकांनी ३० ते ४० वर्षापासुन वास्तव करीत असुन त्यांना पंतप्रधान आवास योजने पासून वंचित ठेवले जात असुन त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच नियमानुसार घरकुल बांधकाम करण्याकरीता शासन निर्णयानुसार रेती उपलब्ध करुन द्यावी. या संदर्भात खासदार श्री. संजय देशमुख यांनी त्वरीत पुसद नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री. वायकोस हयांना हया संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. तेंव्हा मुख्याधिकारी न.प. पुसद यांनी खासदार महोदयांना सदर घरकुल व लिज पट्टे बाबत त्वरीत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.या शिस्त मंडळामध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विजय बाबर, पुसद विधानसभा संघटक, वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष जयानंद उबाळे, महासचिव अरुण राऊत उपस्थित होते.



