मोहनलालजी पुरोहित कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९७.२६ टक्के
१६ वर्षांची यशाची परंपरा : कला शाखेत ७६.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

महागाव/प्रतिनिधी( संदीप कदम):-महागाव येथे १६ वर्षापूर्वी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महागाव येथील स्व. मोहनलालजी पुरोहित कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालात यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली. विज्ञान शाखेचा निकाल ९७.२६ टक्के तर कला शाखेचा निकाल ७६.७४ टक्के लागला आहे.विज्ञान शाखेत रोहण राजेश पाटील (७७.५० टक्के), अश्विनी मुंडे (६९.८३ टक्के), सायली पाटील (६९.६७ टक्के), दामिनी कुरवाडे (६९.१७ टक्के), वैष्णवी पुरोहित (६७.५० टक्के), यश नरवाडे (६७.५०टक्के) तर कला शाखेत समृद्धी कलाने (७३.३३ टक्के), बादल चव्हाण (६८.५० टक्के), वैभव जंगले (६३.६७ टक्के) गुण घेऊन उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थपक अध्यक्ष रितेश पुरोहित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरोस चव्हाण, प्राचार्य दीपक संगेवार, प्रा. मारुती गोरे, प्रा. अबिंका मुनेश्वर, प्रा. सचिन शिंदे, प्रा. अमोल राठोड यांनी केले.



