ईतर

राजकीय व प्रशासकीय अनस्थेपोटी वर्तुळाकार (रिंगरोड) रस्ता रखडला!-अशोक बाबर अध्यक्ष वर्तुळाकार (रिंगरोड) कृती समिती  

पुसद: शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्तुळाकार (रिंगरोड) रस्ता मागील कित्येक वर्षापासून प्रस्तावित करण्यात आलेल्या या वर्तुळाकार रस्त्याच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र राजकीय व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा रस्ता आजही प्रलंबित आहे.पुसद शहर परिसरातील या वर्तुळकार (रिंगरोड) रस्त्यासाठी भूसंपादन व बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली मागेच मिळाली आहे. हा शासन निर्णय १५ जानेवारी २०२४ झाला असून त्यासाठी ४८ कोटी ६४ लाख एवढा निधी २०२४ मध्ये मंजूर सुद्धा झाला होता. या रिंगरोडचे सरेखा अलाइनमेंट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून पुणे येथील सार्थक इंजिनीयरिंग प्रोप्रायटर शहा या सर्वेअरची नियुक्ती केलीहोती.या सर्वेचे काम १५ जानेवारी २०२४ पासून ३ महिन्यांच्या कालावधीत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी करून घ्यावयाचे असताना हे रिंगरोड अलाइनमेंटचे काम आजपर्यंत २२ ते २३ महिने होऊनही केले नाही. हे काम करण्यासाठी रिंगरोड कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर यांनी वारंवार निवेदने दिली.२०२४ या वर्षात रिंगरोड अलाइनमेंट व बांधकाम पूर्ण न केल्यामुळे २०२४ व २०२५ या दोन वर्षांच्या आर्थिक वर्षात काम न करता शहर विकास आराखडा १९९८ केल्यामुळे या रिंगरोडच्या किंमतीत २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. ही वाढ जनतेच्या खिशाला व शासनाच्या तिजोरीला झळ पोहोचवणारी आहे.शहराच्या बाहेरून येणारी जडवाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन निष्पाप ग्रामीण व शहरी लोकांचे बळी बळी जात आहे. जडवाहनांखाली अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रहदारीच्या तापामुळे पोलिस खात्याच्या वाहतूक विभागालासुद्धा या जडवाहनांवर नियंत्रण आणने कठीण झाले आहे. तरीही सबंधित येथील राजकारण्यांना व प्रशासनातील अधिकाऱ्यांना घाम फुटत नाही. या शहराला जोडणारे असंख्य डीपी रोडचा समावेश आहे. त्यापैकी बाहेरगावांवरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्याकरिता महत्त्वाचे तीन डीपी रोड आहे. त्यात महत्त्वाचा डीपी रोड क्रमांक १ पुसद-दिग्रस महामार्ग पुसनदीच्या बाजूने जलशुद्धीकरण केंद्राकडून जाणारा भोजला फाटा वाशीम मार्गावरील रेस्ट हाऊससमोर निघणारा हा बायपास डीपी रोड १ किमी लांबीचा पुसद नपने आजपर्यंत विकसित केला असता तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जडवाहनांचा ताण कमी झाला असता. शिवाय अपघातांचे प्रमाणही कमी झाले असते.हे रस्ते विकसित झाले असते तर नागपूर, चंद्रपूर, वाशिम, संभाजीनगर, पुणे आदी मार्गावर जाणारी वाहतूक शहरात न येता थेट बायपासने निघाली असती. उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनीही पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डीपी रोड कामाबाबत पत्रव्यवहार केला आहे. तरीही सर्वेक्षण व प्रस्तावाची प्रक्रिया सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. तातडीने सर्वे करून निधी उपलब्ध करून रस्ते विकसित करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.परंतु संबंधित प्रशासनाने अजूनही या वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतले नाही. वर्तुळाकार ( रिंगरोडचे) ग्रहण कायम राहिल्याने पुसदकरांची प्रतीक्षा अधिक वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close