पुसद येथील श्री गजानन जाधव यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार बहाल!

पुसद :भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मागील १९ वर्षापासून नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता, “राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान ,अमरावती”चा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण शेतीचा व शेती प्रयोगाचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात येतो. माणुसकीच्या भिंतीचे सन्माननीय अध्यक्ष श्री गजानन जाधव यांनी आपल्या शेतात चंदन,आंबा, करवंद, फणस व केळी लावलेली आहे व सोबतच ते त्यामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला घेतात, त्यांच्या या नाविन्यपूर्ण व उपक्रमाशील शेतीची व मेहनतीची दखल घेत यावेळेस “राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती”च्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार २०२५ शेतकऱ्याच्या बांधावर” ह्या पुरस्कारासाठी श्री गजानन जाधव यांची निवड करण्यात आली व त्यांना निंबी पार्डी येथील त्यांच्या शेतात हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . हा गौरवाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण दीपकभाऊ आसेगावकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव साबळे , पुरस्कार निवड समिती अध्यक्षा मा श्रीमती पौर्णिमाताई सवाई, अमरावती विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ दिलीप काळे, मा प्रेमभाऊ राठोड, सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार श्री पंकजपाल महाराज, गीताई केंद्र पुसद च्या श्रीमती शैलाताई सावंत, प्रगतिशील कास्तकार संभाजीराव टेटर, कृषी निष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय जाधव, कृषी पर्यवेक्षक सूर्य साहेब आणि सक्षम नारी मंडळ भुसावळ च्या महिला पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पुसद मधील प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी रत्न पुरस्काराचे स्वरूप स्व राजीव गांधी यांची प्रतिमा, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गजानन जाधव यांना सन्मानित करण्यात आले.या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सुनिल ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज पाल महाराज यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पंजाबराव ढेकळे, अनंता चतुर,श्री संतोष गावंडे, शिवराम शेटे, मधुकर चव्हाण साहेब, रमेश डबोळे रामचंद्र जाधव,सर, अमित हटवार सर, धनंजय आघाम, गणेश सावंत, ओम वाकोडे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे छायांकन धनंजय आघम यांनी तर वृत्तांकन सुनिल ठाकरे यांनी केले.



