लोखंडी तलवार घेऊन गावात दहशत माजविणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा हिसका!
खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शेबाळपीपरी येथे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक गस्त घालत असताना मुखबिराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की ईसापुरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानी जवळ एक धारदार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगून असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून धारदार शस्त्रासह पंचासमक्ष पंचनामा करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की,पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शेबाळपीपरी येथे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक दि.१४ डिसेंबर रोजी गस्त घालत असताना मुखबिराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की ईसापुरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानी जवळ काही तरुण एक धारदार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगून असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना धारदार शस्त्रासह पंचासमक्ष पंचनामा करून एक लोखंडी धारदार गंजलेली निमुळते टोक असलेली तलवार ज्याची एकूण लांबी ३२ इंच पात्याची लांबी २५ इंच पात्याचे मध्यभागी रुंदी १ इंच मुठची ची लांबी ७ इंच किंमत अंदाजे१०००/- रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी क्रमांक १) शेख तोहीत शेख शफी वय २२ वर्षे,२) सय्यद असिफ सय्यद सलीम वय २० वर्षे, ३) शेख अमीर खान फारुक वय २५ वर्ष, रा.शेंबाळ पिंपरी ता. पुसद जि. यवतमाळ, या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पो.शी/३५२ सुनील विठ्ठलराव पंडागळे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी फिर्याद दाखल केली असून तिन्ही आरोपी विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये अप क्रमांक ४९६/२०२४ कलम ४/२५आर्म ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची ही कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ रजनीकांत चुलमुला सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, ज्ञानोबा देवकते, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एपीआय गजानन गजभारे पीएसआय शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल रमेश राठोड हेड कॉन्स्टेबल संतोष भोरगे हेड कॉन्स्टेबल तेजाब रणखांब पीसी सुनिल पंडागळे डीपीएसआय रवींद्र श्रीरामे यांनी केली आहे.



