आमदार ॲड.निलय नाईक यांच्या हस्ते न.प.प्रभाग क्र.१४ मध्ये विविध ठिकाणी डांबरीकरण रोड व नालीच्या बांधकामांचे भूमिपूजन!
ओबीसी जिल्हाध्यक्ष भाजपा शेखर वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश

पुसद : नगर परिषद मधील प्रभाग क्रमांक १४ मध्ये आमदार निलय नाईक यांच्या निधीमधून डांबरीकरण रोड व नालीचे बांधकाम भाजप आमदार ॲड.निलय नाईक हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच शेखर वानखेडे यांच्या पाठपुराव्यामुळे एक कोटी रुपये निधीतून डांबरीकरण रोड नालीचे भूमिपूजन दि.१७ डिसेंबर रोजी करण्यात आले. 
याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक,माजी नगरसेवक निळकंठ पाटील, विश्वास भवरे, निखिल चिद्दरवार,भाजपा शहराध्यक्ष दीपक परिहार, महेश नाईक,राजू जगताप,महेश मिश्रा,शंकर गावंडे,दीपक काळे,अमोल उबाळे पाटील,रवि ग्यानचंदानी,सुरज डुब्बेवार,भारत पाटील,विक्रांत जिल्हेवार, पांडुरंग उतळे,सतिष कानडे,विजय भेलके,नटवर उंटवाल,मनोज ठाकरे,संग्राम देशमुख,ओमप्रकाश शिंदे,पंजाब सुरोशे सर,अमोल शिंदे,गोपाल सुरोशे,आनंद पाटील,महेश काळे,प्रतीक चव्हाण, पुंजाराम मस्के,अलोने,विलास खंदारे,रूपाली जयस्वाल,दिपाली जाधव,अनिता चव्हाण पाटील,दिपाताई पांडे,मंगला वानखेडे, पल्लवी तायडे,सीमा उतळे, डॉ.देशपांडे ताई,स्नेहल खाकरे,व इतर रविराज नगर,रूग्वेद कॅम्प,गजानन नगर,संजय नगर,या प्रभाग क्रमांक १४ मधील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता..



