जप्त केलेला १९ लाख६५हजार ३४८रुपयाचा अवैध गुटखा जाळून नष्ट;पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे मात्र दणाणले!

पुसद : शहरात पाच-सहा दिवसांपूर्वी पुसद पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपीनीय माहितीवरून धनकेश्वर नगर मोमीनपुरा येथे बोलेरो मॅक्स पिकप व बोलेरो अशा दोन वाहनातून उतरणारा अवैध गुटख्याचा १९ लाख ६५ हजार ३४८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन गुटखा तस्कराला अटक करण्यात आली होती तो अवैध गुटख्याचा साठा आज नगरपरिषद प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून पोलिस बंदोबस्तात डम्पिंग ग्राउंड इंदिरानगर येथे जाळून नष्ट करण्यात आला.या घटनेने शहरातील व ग्रामीण भागातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
पुसद शहरात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपीनिय माहितीवरून दि. ३ जानेवारी २०२५ रोजी अवैध गुटख्याचा माल दोन वाहनांमध्ये भरून धनकेश्वर नगर, मोमीनपुरा, पुसद येथे येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या पथकाने सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली त्यावेळी मोमीनपूरा येथुन पुसद कडे दोन चारचाकी वाहने येतांना दिसली त्यामधील मालवाहू बोलेरो मॅक्स पिकअप वाहन कमांक एम.एच.२६ सी.एच. ०२६४ हे वाहन चालक आरोपी नामे (१) जमीर खान अजब खान, वय ३८ वर्षे, रा. सुदर्शन नगर, पुसद हा होता तर दुसरे वाहन चारचाकी बोलेरो वाहन क्रमांक एम.एच २९ आर २७१० हे वाहन आरोपी नामे (२) मोहम्मद मुद्दसीर अब्दुल कदीर, वय २९ वर्षे, रा. सुदर्शन नगर, पुसद हे चालक होते. तेव्हा सदर दोन्ही वाहनांना थांबवून रस्त्याच्या बाजुला लावण्यास सांगून दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्या दोन्ही वाहनांमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक शासनाकडे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखु व पानमसाला गुटख्याचा अवैध साठा अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला.
सदर दोन्ही आरोपीचे ताब्यातील वाहनामध्ये भरलेला गुटख्याचा माल ६,४५,३४८/- रूपयाचा व मालवाहू बोलेरो मॅक्स पिकअप वाहन किंमत अंदाजे ८,०००००/- रूपये व बोलेरो वाहन किंमत अंदाजे ५,०००००/- रूपये व दोन्ही चालकांकडील जप्त केलेले ०२ मोबाईल किंमत अंदाजे २०,०००/- असा एकुण १९,६५,३४८/- रूपयाचा मुद्येमाल घटनास्थळी जप्त केला.व आरोपी विरुध्द पुसद पोलिसांत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी अवैध गुटख्याचा साठा जप्त करून त्याचा पंचनामा करुन कारवाई केल्यानंतर गुरुवारी नगरपरिषदेच्या माहूर रस्त्यावरील इंदिरानगर कचरा डेपोजवळ जाळून विल्हेवाट लावली. यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी संजय पवार जमादार, चालक संतोष उंटवाल, सफाई कर्मचारी विक्रम उंटवाल, दर्शन कामाडे,सागर उंटवाल शहर पोलीस स्टेशनचे मेजर प्रल्हाद राठोड, कॉन्स्टेबल राहुल पवार अदी कर्मचारी उपस्थित होते.



