निष्पाप शेतकऱ्यांच्या कष्टावर काटामारी करून दरोडा टाकणाऱ्या , दोषीवर निष्पक्ष चौकशी करून गुन्हे दाखल करा – शेतकरी नेते मनीष जाधव!

पुसद : येथील बाजार समितीत आमटी- येथील देवराव अप्पाराव व्हलगिर या शेतकऱ्यांने गहू विक्रीसाठी आणला लिलावा नंतर गाडी काटा करण्यास लागली असता पहिल्यांदा ४२ क्विंटल ३५ किलो गहूचा वजन काटा झाला पण आपला गहू वजनाने जास्त असल्याची खात्री शेतकऱ्याला होती , शंका आल्यानंतर २४ मिनिटानंतर परत हीच गाडी वजन काट्यावर लावली असता त्याच गहूचा वजन ५२ क्विंटल १० किलो भरला या दोन्ही वजनातील काटामारीचा विसंगत तफावत पाहून शेतकरी चक्रावून गेला व संताप व्यक्त करत हा
संपूर्ण प्रकार उघडकीस आला यार्डात एकच खळबळ उडवून गेली बाकीच्या शेतकऱ्यांनी या विषयावर संतप्त प्रतिक्रिया देत वजन काट्या बद्दल आक्षेप नोंदवला व हा आक्रोश घेऊन नागपूर – पुसद महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला कधी हमाली , मापारी च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पठाणी वसुलीचा वाद समोर येतो तर कधी कर्मचाऱ्यांवरच संस्थेच्या माध्यमातून वेळेवर पगार होत नसल्याने अनेकदा स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्याकडून काम बंद आंदोलनाच्या हत्यार उपसून ही बाजार समिती बंद ठेवतात याच आर्थिक फटका व नाहक त्रास उपविभागातील शेतकऱ्यांना सोसावा लागतो ही बाजार समिती म्हणजे निष्पाप शेतकऱ्यांसाठी कत्तलखाना ठरत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते मनीष जाधव यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांच्या आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेबांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी काटामारी व बाजार समितीतील होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषण व स्थानिक बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांसोबत होत असलेली मुजोरी व आरेरावी व भ्रष्ट व्यवस्थेबद्दल व या गंभीर घटनेची उपविभागातील शेतकऱ्यांना उत्तर देणे अपेक्षित असून हि काटामारी कधीपासून चालू आहे मापारी सोबत कोणा- कोणाच आर्थिक लुटीचे हितसंबंध आहे चौकशीत समोर यायला हवं या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता निष्पक्ष सखोल चौकशी करण्यात याव दोषीवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई साठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे खरे शेतकरी हितेशी असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा असेआवाहन नाईकांना शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले.
बाजार समितीमध्ये तणाव निर्माण झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुसद शहरचे ठाणेदार सदानंद वानखेडे साहेब यांनी दगडा बंदोबस्त ठेवला होता शेतकऱ्यांचा संताप अनावर होता काही काळ शेतकऱ्यांच्या आक्षेपामुळे तणावाच वातावरण होते या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे संजय देशमुखांनी शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या माध्यमातून फोनवरून ठाणेदार वानखेडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल साहेब यांनी शेतकरी नेते मनीष जाधव यांना निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले पिढीत शेतकऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये बयान साठी नेण्यात आले बाजार समितीतील वजन काटा कार्यालयाला पोलीस प्रशासनाने सील करून वाहतूक व्यवस्था बंद केली बाजार समितीमध्ये तळपत्या उन्हात शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह इतर भौतिक सोयी सुविधांचा अभाव, लिलाव प्रक्रिया अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही बाजार समितीतून व्यापाऱ्यांच्या गोडाऊनपर्यंत शेतकऱ्यांना शेतमाल खाली कराव लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी यावेळी केल्या वेळोवेळी
काट्याची तपासणी होत नाही काटा कार्यालयाबाहेर स्क्रीन डिजिटल पट्टी बंद असल्याने शेतकऱ्यांना काटा झाले की , सांख्यिकी आकडेवारी दिसत नाही या सर्व कारभाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून आज दिवसभरात १४० शेतकऱ्यांच्या लिलाव या ठिकाणी झाला या सर्व शेतकऱ्यांचा मनात आपल्या शेतमालावर काटा मारला गेला असा संभ्रम असून स्थानिक बाजार समितीच्या सभापती व संचालक मंडळाने या सर्व शेतकऱ्यांना काटा मारी झालेल्या वजन सरासरी गृहीत धरून शेतकऱ्यांना वजन देऊन त्यांचे आर्थिक नुकसान टाळावे अशी आग्रही मागणी देखील यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली एकूणच या सर्व प्रकारामुळे पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीने भोंगळ व भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्यांची विश्वासहर्ता गमावली आहे शेतकऱ्यांना निरपेक्ष न्याय मिळेपर्यंत आम्ही हा लढा देऊ असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केले यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव , प्रेमराव सरगर तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना विकास राठोड काटखेडा शेतकरी संघर्ष समिती सचिव , सुनील श्रीराम जाधव हिवळणी तलाव आदित्य जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासह शेतकरी उपस्थित होते.



