५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार,आरोपींना न्यायालयात केले हजर

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : तालुक्यातील राजूर कॉलरी येथील महिला चूना भट्यावर काम करून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. पिडीत महिलेच्या मुलाचे आरोपी मधिल एका सोबत आर्थिक व्यवहार होता, त्यामुळे २८ जूनला सायंकाळी चारही आरोपी पैसे मागण्यासाठी राजूर कॉलरी येथे पिडीतेच्या घरी गेले, मात्र पिडीत महिलेचा मुलगा घरी नव्हता, आरोपींनी महिलेला विचारले असता मुलगा घरी नाही असे सांगितले. आरोपीने तुझ्या मुलाच्या विरोधात तक्रार करायची आहे. असे सांगुन पिडीत महिलेला वणी येथे आणले तर या नंतर एक अर्टीका कार किरायाणे करून त्या महिलेला बसवून मुकुटबन रोड वरील एका बारमध्ये जाऊन दारू पिल्ले व एका पाण्याच्या बॉटल मध्ये दारू मिक्स करून आणून आरोपींनी कारमध्ये पिडीतेला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते खडकी (बुरांडा ) व नंतर करनवाडी मार्गे नवरगाव गेले. तिथे एका शेतात पिडीत महिलेवर अत्याचार केला व अनैसर्गिक कृत्य देखील केले. त्यानंतर आरोपीने महिलेला राजूर फाट्यावर सोडून पळ काढला. महिलेने दुसऱ्या दिवशी २९ जून रोजी वणी पोलिस स्टेशन गाठून याबाबतची माहिती पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पिडीत महिलेची तक्रार दाखल करून काही तासांतच आरोपीला जेरबंद केले. आरोपीचे विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (३९),कपिल व्यंकटेश अंबलवार (३५), मनोज अजाबराव गाडगे (४७), वैभव घनश्याम गेडाम (२२) या आरोपीवर ३५४(अ)(१)३६६,३७६, (ड) ५०४,५०६, व एट्रोसिटी ३ (१) (w) (I) ३(१)(w)ii ३ (२) (v) ३ (२) (va) या कलमान्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पांढरकवडा येथील सत्र न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे याला तिन दिवसाचा तर त्याचे तिन्ही सहकारी मित्र यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.