पुसद शहरातील वाशिम रस्त्यालगतच्या महाराष्ट्र गादी पिंजनालय दुकानाजवळ आढळला मृतदेह; वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद:वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात वाशिम रस्त्यालगत असलेल्या महाराष्ट्र गादी पिंजनालय जवळ २४ तासापासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह दि.२८मे च्या सकाळी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास आढळून आला आसल्याने एकच खळबळ उडाली होती.सुखदेव मोरेश्वर कांबळे वय ५८ वर्षे रा.खडसे मैदान वसंत नगर असे मृतदेह आढळलेल्या इसमाचे नाव आहे.याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,अनिल सुखदेव कांबळे रा. खडसे मैदान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे वडील सुखदेव मोरेश्वर कांबळे हे दि.२७ मे२०२४ रोजी सकाळी घरुन कटला घेऊन घरून बाहेर पडले होता. परंतु ते कोंढई येथे नातेवाईकांच्या कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याची चर्चा घरी करत होता. मात्र ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच आढळून आले नाही.परंतु दि. २८मे २०२४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र गादी कारखान्याचे मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानासमोर एक अनोळखी व्यक्ती झोपून असल्याचे दिसून आले त्यावेळी त्याची हालचाल व चौकशी केली असता दुकान मालकास त्याचा मृत्यू झाला असल्याचा संशय आला त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वसंत नगर पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन बीट जमदार सुदाम आडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा पंचनामा केला.व मृतदेहाची ओळख पटवली त्यानंतर नातेवाईकाला माहिती देण्यात आली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पुसद येथे पाठविण्यात आला. मृत सुखदेव यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व पत्नी असा अपत्य परीवार असुन एक मुलगा पुणे येथे मोलमजुरी करतो तर दुसरा मुलगा पुसद शहरात ऑटो चालवितो आहे. घरचा कमावता गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मृत्युचे कारण अस्पष्ट आसले तरीही याप्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तृतास मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार सुदाम आडे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करीत आहेत.



