ईतर

भवानी माता टेकडी येथे पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा संपन्न…

पुसद:शहरापासून जवळच असलेल्या भवानी माता टेकडीवर  मागील चार वर्षापासून मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था पुसद, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपनाचं कार्य नियमित सुरु आहे. वृक्षारोपना बरोबरच त्यांना नियमित, सातत्याने पाणी देऊन झाडे वाचवल्या जात आहेत. झाडांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची जास्त आवश्यकता असल्याने त्या ठिकाणी पाण्याचे नियोजन करण्यासाठी मोठ्या दोन टाक्या तीन वर्षांपूर्वी माणुसकीची भिंत दात्यांकडू बसवण्यात आल्या होत्या ते पाणी कमी पडत असल्यामुळे आज रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी माणुसकीची भिंत दाते  अविनाश पांडुरंग उत्तरवार अमेरिका यांच्या कडून दोन हजार लिटरची पाण्याची क्षमता असलेल्या टाकीचा लोकाअर्पण सोहळा करण्यात आला.

यावेळेस माणुसकीची भिंत अध्यक्ष यांनी पुसदवासीयांना भवानी माता टेकडी येथे झाडाला पाणी व त्यांची देखरेख करण्याकरिता रविवार व बुधवार हप्त्यातून दोन दिवस सकाळी सात ते नऊ पर्यंत वेळ देण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित मान्यवर महादेवा स्टाईल चे विशाल भाऊ डुबेवार, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश डंबोळे , माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव,वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अमोल गंगात्रे, नितीन चव्हाण ,विनोद शिंदे सर, पवन बोजेवार,राजेश माकोडे, मधुकर चव्हाण पंजाब ढेकळे,मंगेश भगत, आदित्य जाधव, क्रिश आगलावे, अमित हटवार संतोष गावंडे,आनंता चतुर, गणेश सावंत, निखिल गादेवार,किरण किनाके, नयन रामधनी ,निर्भय बंद्रप प्रमोद ठाकूर दादाराव पाईकराव व इतर निंबी व पार्डी येथील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते….

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close