
पुसद:पुरोगामी महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले हरितक्रांतीचे प्रणेते महानायक कै.वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचा पाया रचला होता तर पुतळा असलेल्या याच परिसरात नाईक साहेब यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत वसंत उद्यानामध्ये तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाईक साहेबांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे यासाठी जवळपास १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती तर ११.७ कोटी रुपये खर्च नाईक साहेबांच्या स्मारकावर खर्च करण्यात आला होता त्यानंतर भाजपच्या सरकारच्या काळात सुद्धा या समारंभासाठी निधी प्राप्त झाला होता त्यामध्ये वसंत उद्यानात स्मारक उभारले असून काही निधी गहुली येथील समाधी स्थळावर खर्च केला गेला परंतु अनेक वर्षांपासून प्रशासकीय उदासीनतेमुळे व राज्यकर्त्याच्या गलथान कारभारामुळे या स्मारकाची दुरवस्था झाली आहे.
अनेक कोट्यावधीचा खर्च करूनही उद्घाटनाअभावी हे पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक पडून असून, सरकारी स्तरावर या स्मारकाच्या देखभालीकडे जाणीवपूक दुर्लक्ष झाल्याने स्मारकाच्या आवारात काटेरी झुडपे वाढली असून, या वास्तूची मोठी दुर्दशा झाली आहे ज्यामुळे हरितक्रांतीच्या या प्रणेत्याच्या पुर्णाकृती पुतळ्याचा व स्मारकांच्या लोकार्पणाचा जाणीवपूर्वक या राज्यकर्त्यांना व संबंधित प्रशासनाला विसर पडला की काय.? असा प्रश्न या मतदारसंघातील वसंतप्रेमीना पडला असून मतदारसंघात मोठी नाराजी संबंधित प्रशासनाबाबत व स्थानिक राज्यकर्त्याबाबत पाहावयास मिळत आहे.तर नाईक साहेबांच्या नावावर आणखी किती दिवस शासनाचा निधी संबंधित प्रशासन व स्थानिक राज्यकर्ते लाटणार आहेत अशी चर्चा मतदारसंघात सध्या सुरू आहे. परंतु सध्या सहा खात्याचे राज्यमंत्री असलेले इंद्रनील नाईक यांनी पुन्हा या वसंत उद्यानाच्या पुनर्निर्मानासाठी व सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तब्बल १९कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर करून आणल्याचा गवगवा सुरू आहे.
पण नाईक साहेबांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या व सुमारकाचा लोकार्पण सोहळा का रखडला यावर मात्र प्रशासन किंवा राज्यकर्ते चक्कार शब्दही बोलायला तयार नाहीत हे मात्र विशेष आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी” हा मूलमंत्र संपूर्ण जगाला देणाऱे तसेच हरितक्रांतीच्या माध्यमातून समृद्ध राज्याची पायाभरणी करणाऱे राज्यातील आपला ‘शेतकरी कारखानदार झाला पाहिजे” हे स्वप्न बाळगणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचा पाया तत्कालीन पंतप्रधान स्व .राजीव गांधी यांच्या हस्ते रचला गेला होता. तसेच याच परिसरात नाईक साहेब यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत बाबासाहेब नाईक इंजिनिअर कॉलेज जवळील वसंत उद्यानात भव्य दिव्य स्मारक व्हावे या हेतूने तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती तर ११.७ कोटी स्मारकावर खर्च करण्यात आला तर तर बाकीचा निधी गहुली येथील समाधी स्थळावर खर्च करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सुद्धा वाढीव निधी खर्च करण्यात आला होता. काँग्रेस आणि भाजप सरकारच्या काळात कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून सुद्धा या पूर्णाकृती पुतळ्याचा व व स्मारकाचा लोकापर्ण सोहळा आज पर्यंत राजकीय अनास्थेमुळे रखडला आहे याला जबाबदार राज्यकर्ते आणि संबंधित प्रशासन असल्याचे बोलल्या जात आहे परंतु आता महायुतीच्या राज्य सरकारच्या काळात सहा खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे की पुसद शहरातील वसंत उद्यान पुनरनिर्माण करण्यासाठी व विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे या उद्यानाचे विकासाचे व देखभालीचे काम रखडल्याने तसेच माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याकरिता महायुती सरकारने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मागणीचा व पाठ पुराव्याचा विचार करून वसंत उद्याचा कायापालट करण्यासाठी तब्बल १९ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्र्याच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुसद मतदार संघातील वसंत प्रेमींना आनंदाची वार्ता असली तरीही आज दहा वर्षापासून या कामाला उशीर कां झाला याला राजकीय अनास्था किंवा सबंधित प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. परंतु स्व. नाईक साहेब यांच्या विविध वस्तूंच्या संग्रहालयासह त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व वसंत उद्यान पुनर्निर्मानासाठी मिळालेला हा संपूर्ण निधी खरोखरच योग्य रीतीने कामाला लागायला हवा यासाठी ना. इंद्रनील नाईक यांनी डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावे. हीच मतदार संघातील वसंत प्रेमीची मागणी आहे.
महायुतीच्या सरकारकडे सततच्या पाठपुराव्यामुळे स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या स्मृतीस्थळ उभारण्यात आलेल्या या वसंत उद्याना च्या पुनर्निर्माणस आणि सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने भक्कम निधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आभार मानले आहे…-ना. राज्यमंत्री इंद्रनील नाईक
मागील १३ वर्षापासून हस्तांतरण कां नाही.?काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीत..
महानायक स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊन सुद्धा अनेक वर्षे झालीत. परंतु, अद्यापही संबंधित ग्रामपंचायतीने किंवा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानने जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यामुळे या स्मारकाची दुर्दशा झाली असून सबंधित प्रशासनाच्या देखरेखी खाली या स्मारकाचे काम करण्यात आले त्यांच्याकडे स्थानिक राज्यकर्त्यांचे व संबंधित प्रशासनाचे उदासीन धोरण दिसून येत आहे तर या स्मारकाच्या कामाची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पुनर्निर्मानासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून या स्मारकाभोवती संरक्षक भिंत, जलकुंभ, सुसज्ज प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते ही कामे पूर्ण करण्याची गरज आहे…



