ईतरक्राइम

डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद पोलीस उपविभागात तिहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ

पुसद: शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड घडले असताना दुसरीकडे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडीपुर मध्ये एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना उघड झाली आहे एकाच दिवशी पुसद सारख्या शहरात तिहेरी हत्याकांड घडल्याने पंचकोशीत खळबळ उडाली आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून एकाच कुटुंबातील तिघांवर कोयता, चाकूने सपासप वार करून तिहेरी हत्याकांड घडविण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी आहे. ही घटना येथील विठाळा स्थित हनुमंत बापू मंदिरालगत २० जुलैच्या पहाटेच्या सुमारास १:३० वाजता घडली. दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असताना शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडीपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणाची डोक्यात धारदार दगडाने निर्गुण हत्या केल्याची घटना दि.२० जुलै २०२३ रोजीच्या घडली आहे.संघदीप संजय भगत वय २३ वर्षे रा.कवडीपुर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघदीप हा सुमारे दीड वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालय जवळ झालेल्या खुनामध्ये सामील असल्याचे समोर आले आहे.तो दि.१९ जुलै २०२३ रोजी पुसद न्यायालयांमध्ये तारखेकरिता आला होता. हल्लेखोरांना संघदीप कवडीपूर येथे आला असल्याची माहिती मिळाली.त्या माहितीच्या आधारे दोघांनी संघदीप संजय भगत वय२३ वर्षे,धारदार चिऱ्याने (दगड) त्याच्या डोक्यावर व मानेवर वार करून हत्या केल्याची फिर्याद बाळू आनंदा भगत वय ४२ वर्षे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी पाच आरोपी विरोधात ३०२,१४३,१४७,१४८,१४९,३२३, भादवी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुसद पोलीस उपविभागात एकाच दिवशी तिहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे.सदर हात्या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांकडून केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close