ईतर

शंभुराजे गणेश उत्सव समिती वाकोडी यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न:अनेकांकडून मंडळाचे कौतुक!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-आज २५ सप्टेंबरला महागाव तालुक्यातील वाकोडी येथे शंभूराजे गणेश उत्सव समिती वाकोडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी यवतमाळ, पुसद, नांदेड येथे आपल्या परिसरातील रुग्ण हे उपचाराकरिता जात असतात कोणत्याही ठिकाणी रक्ताची आवश्यकता भासल्यास आम्ही रुग्णांना रक्त उपलब्ध करून देईल अशी भावना गणेश उत्सव समितीने व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाकोडीचे भूषण पीएसआय अमोल पाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजू राठोड,सरपंच स्वप्निल वीरखडे, किरण भोपाळे, गणेश मंडळाचे अध्यक्ष ओमकार गावंडे,उपाध्यक्ष शुभम पाटे, शिवसेना विभाग प्रमुख प्रविण पुंडे , दीपक गावंडे सर, देवानंद फोपसे, अमोल भोपाळे,गौरव रामटेके, शुभम डोरले, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये गुलाबराव चेके, आकाश गावंडे, अंकुश आन्ने, अविनाश पाईकराव, आनंद सारंगे, लक्ष्मण भडंगे, गोपाल टारपे, गणेश पाटे , यांच्यासह एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली यावेळी मंडळाच्या सर्व सदस्यांनी आता परिश्रम घेतले.

या रक्तदान शिबिराचे रक्त संकलन मेडिकेअर ब्लड बँक पुसद यांचे कर्मचारी श्याम ढोकणे, गणेश तळणकर, दीपक सूर्यवंशी, विकी गायकवाड ,यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close