ईतर

मेडिकेअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पाच वर्षाच्या मुलाच्या पोटातील काढले नाणे, जोखमीची शस्त्रक्रिया टळली

प्रतिनिधी/पुसद:मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे ५ वर्ष वयाच्या मुलांच्या पोटातून १५ दिवसापासून आडकेलेले १ रुपयाचे नाणे (कॉईन) शस्त्रक्रिया न करता इन्डोस्कोपी च्या माध्यमातून काढण्यात मेडीकेअरच्या चमूला यश मिळाले व ५ वर्षाच्या मुलावरील जोखमीची शस्त्रक्रिया टळली.मेडिकेअर हॉस्पिटल येथे सार्थक ज्ञानेश्वर चव्हाण वय ५ वर्ष राहणार वाघजाळी नावाचा बालक १ रुपयाचे नाणे (कॉईन) खाऊन आईवडिलांनी पोटाच्या त्रासासाठी त्याला दाखल केले. कॉईन खाल्यावर सर्वांनी नाणे (कॉईन) पुढे सरकून शौच्याद्वारे निघून जाईल असा सल्ला दिला. पण १० दिवस झाले तरी कॉईन शौच्याद्वारे न निघाल्यामुळे त्याला मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे दाखविण्यात आले. त्याला सारखे पोट दुखणे, अधून मधून उलटीचा त्रास रोज होत होता.त्याला पूर्ण बेशुद्ध करून नाणे (कॉईन) इन्डोस्कोपी द्वारे काढण्याचे ठरविले व कॉईन यशस्वीरित्या काहीही चिरफाड न करता डॉ. विरेन पापळकर व डॉ. विक्रांत लोहकरे यांच्या चमूने काढून दुसऱ्या दिवशी बाळाला सुखरूप सुट्टी करण्यात आली. बधिरीकरण तज्ञ डॉ. ललित जाधव व त्यांच्या चमूने यशस्वीरित्या बधीरीकरणाची प्रक्रिया सांभाळली. कॉईन पोटात (जठर) येथे अडकून फसले होते त्याला मोकळे करून एका विशिष्ट फोरसेफ (इनस्टूमेंट ने) नाणे काढण्यात आले असे डॉ. विरेन पापळकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close