Uncategorizedराजकिय

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या निमित्त एका दिवसाठी खाजगी जागेवर हेलिपॅड उभारून सा. बां. विभागाने जनतेच्या कराच्या पैशाची मुक्तपणे केली उधळण!

नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या हेलीपॅड च्या कामाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी!

  • पुसद : अधिच यवतमाळ जिल्ह्य हा आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो यावर्षी जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत या सात महिन्यांच्या कालावधीत १९७ वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे तर एकीकडे त्याच जिल्ह्यातील पुसद तालुक्यात राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ कृषी गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सुरू असताना दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अतिवृष्टीच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शेतकऱ्यांकडून करण्यांत येत असताना प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडे फिरकले सुद्धा नाही.

त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.पंरतु त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पुसद येथे दौऱ्यावर येणार असल्याने मतदारसंघांतील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण या मंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने ह्याही अशा मावळल्या परंतु या दौऱ्या निमित्त येणाऱ्या पाहुण्यासाठी शहरात शासकीय हेलिपॅड पुर्विपासुन उपलब्ध असताना सुद्धा कींवा शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागांच्या कामाची पितळ उघडे पडुनये म्हणून शासनाचे सर्व नियम डावलून शासकीय नियमाना बगल देऊन कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता राजकीय हेतूने प्रेरित होऊन शहराला लागून असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका खाजगी जागेवर नियमबाह्य पद्धतीने जनतेच्या कराच्या पैशातून बेकायदेशीरपणे एका खाजगी कार्यक्रमा निमित्त शासनाच्या तिजोरीत एका दिवसाच्या दोन-तीन तासांसाठी लाखो रुपये खर्च करून हेलिपॅड उभारण्यात आले.

कोणतेही काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार किंवा नावे झाल्याशिवाय ते काम सुरू करू नये, केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही चौकशी न करता निलंबित करण्यात येवू शकते किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते हे आपलेच आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने पायदळी तुडविले आहेत.

 हे उभारलेले हेलिपॅड कायमस्वरूपी नसुन सरकारी कामांसाठी वापरत येणार नाही तरीही या हेलिपॅड वर जनतेच्या कराच्या पैशाची मुक्तपणे  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने नियमबाह्य पद्धतीने लाखो रुपये शासनाच्या निधीची मुक्तपणे धळण केली असून हा जनतेचा पैसा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता कंत्राटदार यांनी संगनमत करून वाया घातला असल्यामुळे हे नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या हेलिपॅड च्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित प्रशासनाच्या  अधिकारी कर्मचारी व कंत्राटदाराने शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी तक्रकर्त्याच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा याप्रकरणी आंदोलन छेडन्याचा तक्रकर्त्यानी इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close