माऊंट लिट्रा झी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत गरुड झेप!

पुसद :येथील माऊंट लिट्रा झी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेची यशाची परंपरा कायम राखली. सदर स्पर्धेचे आयोजन तिरुपती सेलेब्रेशन हॉल दिग्रस येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत १३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविले.मुली मधून इयत्ता सहावीत शिकणारी अभिज्ञा रामदास भडंगे या विद्यार्थीनीने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला . तसेच इयत्ता पहिलील शिकणारा विद्यार्थी देवांश विशाल भंडारी या विद्यार्थ्यांनी मुलातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तसेच बुद्धिबळ प्रशिक्षकांच्या स्पर्धेत चंचल रमाशंकर तिवारी सर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला .सदर शाळेत राष्ट्रीय दर्जाचे क्रिडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले .तसेच वेगवेगळ्या क्रिडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली . सदर विद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदवून स्वतःचे नाव व शाळेचे नाव नाव लौकीक करीत आहेत .सदर विद्यार्थ्यांचे व चंचल तिवारी सर यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा समन्वयक, प्रशासनाधिकारी ,सर्व क्रिडा प्रशिक्षक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले .



