क्राइम

पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना ऊत! अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा सामाजिक कार्यकर्त्याचा उपोषणास बसण्याचा इशारा!

पुसद : पोलीस उपविभागातील कार्यक्षेत्रातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम सर्व अवैध धंदे सुरू असुन पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुजू झाले तेव्हापासून या अवैध धंदे वाल्यांना राजरोसपणे अभय देत असून आपली वरपर्यंत सेटींग आहे त्यामुळे कोणी काही करत नाही बिनधास्त अवैध धंदे चालूद्या असा अप्रत्यक्ष मेसेजेस देत आहेत की काय?हे राजरोसपणे सर्व अवैध धंदे सुरू असल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू तर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा, गावाठी दारू, मटका, जुगार, तितली भवरा,गुटखा विक्री, अवैध वाहतूक व इतर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. अवैध धंदे वाल्यांकडून प्रत्येक बीट मधील बीट जमदार हप्ता वसूली करत आहे. दर महिन्याच्या तारखेला ग्रामीण पोलिसांकडून पठाणी वसूली केली जात असून वेळेवर म्हणजे वेळेवर हप्ता गोळा केला जातो. अवैध धंद्यावाल्याकडून वेळेत हप्ता दिला जात नाही त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर दमदाटी केल्याचे बोलल्या जात आहे एवढं राजरोसपणे सर्वकाही सुरू असताना वरिष्ठ अधिकारी कां.?लक्ष देत नाहीत? याबाबत कारवाई का केली जात नाही? जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे कां? कोणाचा दबाव आहे कां? संबंधित वरिष्ठ अधिकारी सर्व काही मॅनेज करत आहे कां? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या अवैध धंद्ये बंद करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत ‘झेप न्यूज ला’ सामाजिक कार्यकर्ते तक्रारकर्त्यांत्यानी दिलेली माहिती अशी की, पुसद पोलीस उपविभागातील कार्यक्षेत्रातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम सर्व अवैध धंदे सुरू असुन पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुजू झाले तेव्हापासून या अवैध धंद्यांना ऊत आला आहे.तर हे या अवैध धंदे वाल्यांना राजरोसपणे अभय देत आहेत. या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका जुगार, अवैध गावटी दारु, गांजा, गुटखा, टिकली भोवरा, अवैध वाहतुक हे सर्व धंदे कायमस्वरुपी बंद करुन संबंधीत अवैध धंदेवाल्या विरुध्द कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन दिले आहे.कारण ग्रामीण भागात खेड्यापाड्यात,तांडा, आदिवासी वाड्या, वस्तीवर सगळीकडे सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व विक्री, गांजा सारख्या मादक पदार्थांची तसेच देशी व इंग्लिश दारुची अवैध विक्री करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे हे सगळळेे अवैध धंदे चौका-चौकात शाळेजवळ, धर्मस्थळे, पानटरी, किरणा दुकान, वर्दळीच्या ठिकाणी व वाड्या, वस्तीवरील घराघरातून केले जात आहेत. यामुळे आपसूकच जागेवर हे अवैध धंदे सुरु असल्याने सगळीकडे जेष्ठ नागरिक, अल्पवयीन मुले, तसेच ज्या वयात शिक्षण घेऊन व्यायाम करुन शरीरयष्टी कमावून नोकरी किंवा उद्योगधंद्यांत उतरण्याच्या वयातील तरुणवर्गात व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.या अवैध धंद्यांमुळे आजपर्यंत बरेचसे संसार उद्धवस्त झाले आहेत व दररोज कित्येक संसार उद्धवस्त होत असून काही उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कारण व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीसाठी घरातील धान्य भांडीकुंडी महिलांच्या अंगावरील डाग, दागिने विकून व्यसन करीत आहेत यात विशेष करुन माय, माऊलीच्या गळ्यातील सौभाग्याच लेण असलेले मंगळसूत्र मोडून आपली व्यसनपूर्ती करत आहेत. एवढ्यावरच नाही भागले तर घर, शेतजमीनवर कर्ज काढून किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन हा पैसा व्यसनात उडवत असल्याचे दिसून येत आहे. यातुनच व्यसनाधीन लोकांच्या कुंटुबात दररोज भांडणतंटे, महिलांना मारठोक, गल्लीबोळात भांडणतंटे, घरातील सुनांना मुला बाळांना मारझोड मग पुढे घटस्फोट, आत्महत्या अश्या अनेक घटना घडत आहेत तर काही ठिकाणात या व्यसनाच्या आहारी गेलेले अल्पवयातच गेल्याने महिलांना विधूर झाल्या आहेत.तसेच महिला व शाळेकरी मुले-मुली या रस्त्याने ये- जा करतनां सुधा या अवैध धंद्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असतो .त्यामुळे या अवैध धंद्याने गावागावात, घराघरात अशांतता निर्माण झाली आहे. बऱ्याचशा गावागावातून त्रस्त महिला, सुजान नागरिक व तरुणांनी तक्रार करतात पण त्या तक्रारीचे निवारण केल्या जात नाही या ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुजू झाले तेव्हापासून या धंद्याला ऊत आला आहे.या अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्याची महत्त्वाची भूमिका असलेली पोलीसच वसुलीच्या कामात गर्क असतील तर कारवाई होणार कुठून त्यामुळे असे पुढे गैरप्रकार घडु नये किंवा ग्रामीण भागात सर्वसामान्य संसार उध्वस्त होऊ नये म्हणून हे सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे यांनी विभागीय पोलीस आयुक्त अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दि.१६ फेब्रुवारी रोजी दाखल केली असून हे अवैध धंदे तात्काळ बंद न केल्यास दि.२५ फेब्रुवारी २०२६पासून मुखरे चौकात लोकशाही मार्गाने उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close