ईतर

पुसद सा.बां. विभागाच्या कार्यालयात निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याने स्थानिक काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या साखळी उपोषणाला यश!

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी निविदा प्रक्रिया पूर्ण; काँग्रेसचे नेते डॉ. मोहम्मद नदीम यांच्या हस्ते उपोषणाची सांगतात...

पुसद :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत विकास कामाच्या प्रक्रिये निविदा प्रक्रियेत अनियमितता करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला लाभ दिला. त्यामुळे या कार्यालयातील निविदा प्रक्रियेत मोठा आणा गोंदी कारभार सुरु असल्याने निविदा सादर होऊन चार- पाच महिने उलटून निविदा उघडलेल्या गेल्या नाहीत. संबंधित कंत्राटदरांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कडून दबाव आणला जात होता परंतु काही कंत्राटदारांनी दबावाला न जु्मानता निविदा सादर केल्यास त्या निविदा कंत्राटदाराणी परत घ्यावी यासाठी काहीना विनाकारण कागद पत्राची मागणी करुण आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम देणे बाबतच्या घटना घडल्या आहेत.याच अनियमितेतुन शासकीय विश्राम गृह पुसदचे नवीन बांधकाम बाबतची निविदा मागील पाच महिन्यापासून रखडत ठेवली आणि आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम दिले. आणि ह्या निविदा उघडल्या जात नव्हत्या म्हणून विकासकामे ताबडतोब व्हावी, निविदा प्रक्रियेत स्पर्धा कायम रहवी व रखडलेल्या निविदा तात्काळ उघडण्यात याव्या अशा आशियाचे निवेदन पुसद काँग्रेस कमेटीच्या दि.२७ जानेवारी२०२६ ला देण्यात आले होते त्या निवेदना नुसार फेब्रुवारीच्या दुसऱ्या आढवड्यात काही निविदा उघडण्यात आल्या परंतु मुख्य निविदा विश्रामगृह चे नवीन बांधकामचे निविदा उघडण्यात आली नव्हती, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारीच्या वतीने दि.२३ फेब्रुवारी २०२६ पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी संबंधित प्रशासनाने तात्काळ उपोषणाची दखल घेत दि. २३ तारखेच्याच सायं.४:०० वाजण्याच्या सुमारास निविदा उघडण्याची प्रक्रिया पार पाडली. असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंत्यांनी उपोषणकर्त्याना दिल्याने हे साखळी उपोषण स्थगित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या हस्ते शरबत पाजुन स्थगित करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ मोहम्मद नदीम काँग्रेस शहरअध्यक्ष झिया शेख तर कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, प्रदेश अल्पसंख्यायक महासचिव सय्यद इस्ती्यक, तहेसीन खान, नगरसेवक जब्बार लाखे, फिरोज खान, प्रकाश नेमायते, आहेफाज खान, शहर उपाध्यक्ष मोहमद जुनेद, राजेश कांबळे, चेतन कंबळे, प्रशांत जमगडे उपस्थिती होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी ही निविदा प्रक्रिया पार पाडली असली तरीही मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्याच्या उद्देशाने या निविदा प्रक्रियेत खूप आनागोंदी झाली आहे ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे. तर या निविदा प्रक्रियेतून अनियमितता  सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र आहे. अनेक कंत्राटदारांनी या निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता काही नाही तर कोट्यावधींचे कामे सुध्दा केलेली आहे व आजही करत आहेत. मात्र काही कंत्राटदारांना जाणीवपूर्ठवक आपात्र ठरविन्याचे काम या अधिकाऱ्यांनी केलेले आहे आणि आज जे अपात्र असतील तर दोन ते चार महिन्या पूर्वी या  हे कंत्राटदर  पात्र  कसे होते ही बाब तपासावी लागेल या निविदा प्रक्रियेत सर्व कागद पत्राची पाहणी करून आवश्यक असल्यास चुकीची कार्यव्हावी करणाऱ्या अधिकाऱ्यावर न्यायालाईन कार्यवाहीला समोर जावे लागेल  आज हे उपोषण स्थगित केलं असले तरी खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभार रोखण्याची ही तर लढाईची सुरवात आहे. -डॉ.मोहम्मद नदिम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close